पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारच्या भागलपूर येथून PM-KISAN (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी) योजनेचा 19वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना एकूण 22,000 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील. काही वेळातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होतील.
PM किसान योजना म्हणजे काय?
PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.
- पहिला हप्ता: एप्रिल – जुलै
- दुसरा हप्ता: ऑगस्ट – नोव्हेंबर
- तिसरा हप्ता: डिसेंबर – मार्च
दर चार महिन्यांनी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. ही योजना 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केली होती आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती सुरू केली. आज ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना बनली आहे.
19वा हप्ता मिळवण्यासाठी e-KYC अनिवार्य
जर तुम्हाला 19वा हप्ता मिळवायचा असेल, तर e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, “e-KYC PM किसानसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे.
- OTP आधारित e-KYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.
- जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक आधारित e-KYC करता येते.
तुमच्या हप्त्याचा स्टेटस कसा तपासाल?
- PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या.
- ‘Know Your Status’ टॅबवर क्लिक करा.
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि Captcha कोड टाका.
- ‘Get Data’ पर्याय निवडा.
- तुमच्या हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
लाभार्थी यादीत आपले नाव कसे पहाल?
- pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.
- ‘Beneficiary List’ टॅबवर क्लिक करा.
- राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
- ‘Get Report’ वर क्लिक करा.
- त्यानंतर लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.
कोणतीही अडचण असल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा:
☎ 155261 किंवा 011-24300606 वर कॉल करा.
PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.
- ‘New Farmer Registration’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि Captcha कोड टाका.
- सर्व आवश्यक माहिती भरून ‘Yes’ वर क्लिक करा.
- अर्ज पूर्ण करून सेव्ह करा आणि भविष्यासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
कोण अर्ज करू शकतो?
✔ अर्जदार भारतीय नागरिक असावा.
✔ त्याच्याकडे शेतीयोग्य जमीन असावी.
✔ तो लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी असावा.
✔ तो 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळवणारा निवृत्त कर्मचारी नसावा.
PM किसान योजना: महत्त्वाचा आर्थिक आधार
PM किसान योजना ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची योजना आहे. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, तर लवकरात लवकर e-KYC पूर्ण करा. यामुळे तुमचा 19वा हप्ता वेळेत बँक खात्यात जमा होईल.