Multibagger Stocks: या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदाराला दिला 252 पटीने रिटर्न, मालामाल झाले इन्व्हेस्टर्स

Multibagger Stocks: शेअर बाजारात (Share Market) अश्या मोजक्याच कंपन्या आहेत ज्या केवळ काही हजारांची गुंतवणूक करून आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवतात. गेल्या 2 दशकाचा विचार केला तर अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी केवळ काही हजार किंवा लाखांची गुंतवणूक केल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

यामध्ये काही बँकिंग स्टॉक (Banking Stocks) देखील आहेत. या काही कंपन्यांमध्ये खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी (HDFC) चा समावेश आहे.

HDFC ने आपल्या गुंतवणूकदारांना (investor) चांगला परतावा (return) दिला आहे आणि 1 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक (Investment) करूनही गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

एचडीएफसीने 23 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळजवळ 259 पट वाढ करून त्यांना श्रीमंत केलेले आहे. एचडीएफसीचे शेअर्स काल NSE वर म्हणजेच २8 सप्टेंबरला रु. 1387 च्या किमतीवर बंद झाले.

रु. 1725 सह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर,

कंपनीचे शेअर रु. 1725 सह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर होते. गेल्या वर्षी हा स्टॉक 18 ऑक्टोबर रोजी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठू शकला होता. 1 जानेवारी 1999 रोजी HDFC शेअर्सची किंमत 5.52 रुपये होती, जी 23 वर्षांत 25126 टक्क्यांनी वाढून आज 1387 रुपयांवर पोहोचली आहे.

23 वर्षात 40 हजार रुपये झाले 1 कोटी रुपये

याचा अर्थ जर गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी त्यात 40 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1.02 कोटी रुपये झाले असते. या बँकेने तब्बल 25126 टक्के परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

जर आपण कंपनीच्या अलीकडील कामगिरीबद्दल बोललो तर, या वर्षी हा शेअर 5.91 टक्क्यांनी खाली आला आहे. पण संस्थात्मक ब्रोकरेज आणि गुंतवणूक समूह सीएलएसएने यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

CLSA ने HDFC शेअर्समध्ये Rs 2025 च्या टारगेट प्राइस सह स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. सीएलएसएच्या अहवालात बँकेचा हवाला देण्यात आला आहे. व्यवस्थापनाला यामध्ये मजबूत रिटेल गतीची अपेक्षा आहे.