MSRTC Recruitment 2023 : ST महामंडळात काम करण्याची संधी; ८ वी पास आणि ITI चे विद्यार्थी करु शकतात अर्ज

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

MSRTC Recruitment 2023 : ST महामंडळात (MSRTC) काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळ (MSRTC) चंद्रपूर इथे लवकरच एकूण ३५ जागांवर भरती करण्यात येणार आहे.याबाबतची माहिती MSRTC चंद्रपूरच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत.

MSRTC चंद्रपूरच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीबाबतची सर्व माहिती दिली आहे.तर या भरतीसाठीची पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया कशी असेल याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया.या भरतीमध्ये मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर आणि मोटार वाहन बॉडी बिल्डर या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.तर या पदांसाठीच्या एकूण जागा ३५ आहेत.

>> शैक्षणिक पात्रता–

मेकॅनिक डिझेल या पदांसाठी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच ITI आवश्यक आहे.

>> पेंटर–

८ वी पर्यंतच शिक्षण आवश्यक.

>> वेल्डर–

८ वी पर्यंत शिक्षण गरजेच.

>> मोटार वाहन बॉडी बिल्डर–

या पदासाठी १० वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे.शिवाय ITI पण आवश्यक आहे.

>> पगार–

मेकॅनिक डिझेल पदासाठी ६ हजार ते ८ हजार ३८८ रुपयांपर्यंत प्रतिमहिना पगार मिळणार.

पेंटर पदासाठीचा पगार ५ हजार ते ९ हजार ४३६ रुपये प्रतिमहिना.

वेल्डर पदासाठी ५ हजार ते ९ हजार ४३६ रुपये प्रतिमहिना.

मोटार वाहन बॉडी बिल्डर ६ हजार ते ८ हजार ३८८ रुपये प्रतिमहिना

>> या जागांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना खालीलप्रणाणे अर्ज करता येईल.

पात्र उमेदवारांनी MSRTC चंद्रपूर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

https://msrtc.maharashtra.gov.in/index.php

उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी पासपोर्ट आकाराच्या फोटोची आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी आवश्यक आहे.अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्यायला विसरू नका.

Follow us on

Sharing Is Caring: