PM Vishwakarma Yojana: मोदी सरकारने सुरू केलेली ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ गरीब कुटुंबांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत कौशल्य असलेल्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात, कोणतीही गॅरंटी (guarantee) न देता कर्ज उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कठीण होत असेल, तर या योजनेतून 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते.
योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) अंतर्गत सोनार, लोहार, न्हावी, चर्मकार यांसारखे पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना विविध प्रकारे लाभ मिळतो. या योजनेत सरकारने 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश केला आहे, ज्यामुळे भारतभरातील ग्रामीण व शहरी भागांतील कारागीरांना मदत होईल. यामध्ये कारपेंटर, नौकानिर्माता, ताळे बनवणारे, कुंभार, मूर्तिकार, राजमिस्त्री, मासेमारीचे जाळे बनवणारे, खेळणी तयार करणारे अशा अनेक व्यवसायांचा समावेश आहे.
दोन टप्प्यांमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
या योजनेचा मोठा लाभ म्हणजे आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय थांबू नये म्हणून दोन टप्प्यांत कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, तर विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज फक्त 5% व्याजदराने दिले जाते, ज्यामुळे गरीब कुटुंबांना व्यवसाय उभा करण्यास मोठी मदत होते.
15,000 रुपयांची अतिरिक्त मदत
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत कौशल्यवृद्धीसाठी मास्टर प्रशिक्षकांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाते. लाभार्थ्यांना 500 रुपये रोज स्टायपेंड (stipend), पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र (certificate), ओळखपत्र (ID card), 15,000 रुपये टूलकिट प्रोत्साहन (toolkit incentive), तसेच डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन (incentive) दिले जाते. यामुळे लाभार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीला चालना मिळते.
योजना कोण घेऊ शकतो?
योजना घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि योजनेत ठरवलेल्या 18 कौशल्यांपैकी एका कौशल्याशी संबंधित असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे आणि संबंधित कौशल्याचे प्रमाणपत्र असावे. तसेच, योजना ठरवलेल्या 140 जातींपैकी एका जातीशी संबंधित असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र, रहिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक, आणि वैध मोबाइल नंबर लागतो.
अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतो. होमपेजवर “PM Vishwakarma Kaushal Samman Yojana” हा पर्याय निवडून Apply Online या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी करून, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मोबाइलवर SMS द्वारा मिळेल. नंतर फॉर्म वाचून योग्य माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा, आणि फॉर्म तपासून सबमिट करा.