LPG Price Hike: नवीन वर्षांचा पहिला दिवस सुरु होऊन अवघे काही तासच झालेले आहेत आणि इंधन कंपन्यांनी (oil company) ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. 1 जानेवारी पासून एलपीजी सिलेंडर किंमत वाढ (LPG cylinder price hike) केली आहे. दिलासादायक एकच आहे कि ही नवीन वाढ व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वर आहे त्यामुळे घरगुती सिलेंडरच्या ग्राहकांना थोडे बरे वाटेल.
इंधन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी वाढवली आहे परंतु घरगुती सिलेंडरची किंमत जैसे थी ठेवली आहे.
नवीन कमर्शिअल सिलेंडर दरवाढीनंतर दिल्लीत कमर्शिअल सिलिंडरसाठी १७६९ रुपये द्यावे लागतील. तर कोलकात्यात आता कमर्शिअल सिलिंडरची किंमत १८७० रुपय. मुंबई कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत १७२१ रुपये झाली आहे तर चेन्नईत हीच किंमत १९१७ रुपये झाली आहे.
घरगुती सिलिंडरच्याबाबतीत सांगायचं झालं तर यामध्ये ६ जुलै २०२२ रोजी इंधन कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केली होती. एका वर्षात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत १५३.५० रुपयांची वाढ झाली आहे.
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इंधन कंपन्या समीक्षा करतात आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती बद्दल निर्णय घेतात. महिन्याच्या 1 तारखेला सिलिंडरच्या किंमतीत वाढ किंवा घट होत असते.