LPG Cylinder Price: नवीन वर्षात महागाईपासून मिळणार सर्वात मोठा दिलासा, घरगुती LPG सिलेंडरची किंमत एवढ्या रुपयांनी कमी होऊ शकते!

नवीन वर्षात एलपीजी सिलेंडर ची किंमत 150 रुपयांनी कमी होऊ शकते. तर पुढे वाचा आणि जाणून घ्या कोणत्या राज्य सरकारने 500 रुपयांना गैस सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.

LPG Cylinder Price: सामान्य व्यक्तीचे घरचे बजेट LPG Cylinder Price वर अवलंबून आहे. मीडिया मध्ये बातम्या आहेत कि नवीन वर्षात एलपीजी सिलेंडर ची किंमत 150 रुपयांनी कमी होऊ शकते. तर पुढे वाचा आणि जाणून घ्या कोणत्या राज्य सरकारने 500 रुपयांना गैस सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.

नवीन वर्षात एलपीजी वापरून अन्न शिजवणे स्वस्त होऊ शकते. त्यामागे कारण सरकारी तेल कंपन्या नवीन वर्षात घरगुती गैसची किंमत कमी करू शकतात असे मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. ज्याचा फायदा सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना देण्याची शक्यता आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी 6 जुलै 2022 पासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी खाली आल्या आहेत.

दिल्लीत सध्या 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर रिफिल करण्यासाठी 1053 रुपये मोजावे लागतात. कोलकात्यात 1079, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068 रुपये. पटनामध्ये 1151 रुपये, तर लखनऊमध्ये 1090 रुपये द्यावे लागतात.

राजस्थान सरकारच्या निर्णयाने दबाव वाढवला

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून विरोधक मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवत आहेत. भारत जोडो यात्रेवर असलेले राहुल गांधी महागड्या स्वयंपाकाच्या गॅसवर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत आणि 2014 मध्ये घरगुती स्वयंपाकाचा गॅस 414 रुपये प्रति सिलेंडर कसा उपलब्ध होता याची आठवण करून देत आहेत.

तर दुसरीकडे, राजस्थानच्या काँग्रेस सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी 500 रुपयांना सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे, जयपूरमध्ये सध्याची किंमत 1056 रुपये प्रति सिलेंडर आहे. म्हणजेच राज्य सरकार लोकांना अर्ध्या किमतीत एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देणार आहे. राजस्थान सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. त्यामुळेच नवीन वर्षात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत कपात अपेक्षित आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: