Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी पातळीवर आहेत. सततच्या चढ-उतारांमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. अशातच आज 14 नोव्हेंबर 2025, गुरुवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात जाणवण्यासारखे बदल पाहायला मिळाले. सोन्याचा दर उच्च पातळीवरच टिकून आहे, तर चांदीतही तेजी कायम दिसून आली आहे. चला तर जाणून घेऊया आजचा ताजा भाव…
महाराष्ट्रात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 14 November 2025)
बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 128660 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दर 117910 रुपये आहे. एक किलो चांदीचा दर 173100 रुपये आणि 10 ग्रॅम चांदीचा दर 17310 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जमुळे दागिन्यांच्या किमती शहरागणिक वेगळ्या असतात. आता पाहूया तुमच्या शहरातील ताजा भाव…
तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव
| शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर | 24 कॅरेट सोन्याचा दर |
| मुंबई | 117910 रुपये | 128660 रुपये |
| पुणे | 117910 रुपये | 128660 रुपये |
| नागपूर | 117910 रुपये | 128660 रुपये |
| नाशिक | 117910 रुपये | 128660 रुपये |
| कोल्हापूर | 117910 रुपये | 128660 रुपये |
(वरील सोन्याचे दर सूचक असून त्यात GST, TCS आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून तुम्हाला 22 कॅरेट की 24 कॅरेट सोनं हवं आहे हे विचारलं जातं. त्यामुळे शुद्धतेचा फरक जाणून घेणं आवश्यक आहे.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असल्याने ते दागिने बनवण्यासाठी योग्य नसतं. हे प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी वापरलं जातं.
22 कॅरेट सोने अंदाजे 91% शुद्ध असतं आणि यात तांबे, चांदी, जस्त अशा धातूंचे मिश्रण केलं जातं. त्यामुळे दागिने प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्यातच तयार केले जातात.








