Gold Price Update: दिवाळीचा सण अगदी जवळ आला आहे. यावर्षी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा उत्साह आतापासूनच बाजारपेठेत दिसून येत आहे.
लोकांनी दिवाळीची खरेदी आणि साफसफाई सुरू केली आहे. यंदा धनत्रयोदशीचा सण शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी सुरू होते.
धनत्रयोदशीनिमित्त सोन्या-चांदीची मोठी खरेदी होते. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.
कारण, सध्या सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. bankbazaar.com नुसार, आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,680 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
शनिवार आणि रविवारी सोन्या-चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव प्रतिकिलो 71 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याची किंमत 60971 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 71335 रुपये प्रति किलो आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 62250/10 ग्रॅम आहे. तर राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 62110/10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. मुंबईत सोन्याचा भाव 61960/10 ग्रॅम आहे. कोलकात्यात सोन्याचा भाव 61960/10 ग्रॅम आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत
देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 56,950 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 22 कॅरेटची किंमत 56,800 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,800 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, काल म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 60727 रुपये होती. तर 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 55849 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव कालपर्यंत 45728 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. केंद्र सरकारकडून सुट्टीच्या दिवशी दर जारी केले जात नाहीत.