Gold Price Update: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. दोन्ही देशांमधील भीषण युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या युद्धाने जगभरातील लोकांना हादरवून सोडले आहे. त्याचा परिणाम आता सोन्या-चांदीच्या दरावरही दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, युद्धानंतर अचानक सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याला आता वेग आला आहे. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बाजारात जाण्यापूर्वी, तुम्हाला या नवीन किमतींची माहिती असणे आवश्यक आहे. आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
आज 9 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याने 57 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57415 रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 68984 रुपये आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले, DA वाढल्याने त्यांना मिळणार 3 महिन्यांची थकबाकी, जाणून घ्या डिटेल
सोमवारी सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार झाल्यानंतर सराफा बाजारातही तेजी दिसून आली. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज म्हणजेच सोमवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोने 420 रुपयांनी महागले आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५६५३९ रुपये प्रति १० ग्रॅम होता. जो आज सोमवारी 57415 वर आला आहे. ibjarates.com वेबसाइटनुसार, आज 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 57415 रुपयांवर पोहोचली आहे.
भारताचा क्रिकेट सामना सुरु असताना नेहमी मैदानात येणारा ‘जार्वो 69’ नक्की कोण आहे?
त्याच वेळी, 995 सोन्याचा भाव 57185 वर ट्रेंड करत आहे. 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 52592 रुपयांवर पोहोचली आहे, तर 750 शुद्धता असलेल्या 18 कॅरेट सोन्याची किंमत 43061 रुपयांवर पोहोचली आहे. 585 शुद्धतेच्या 14 कॅरेट सोन्याची किंमत 33588 रुपये आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत 68984 रुपये झाली आहे.