Gold Price 15th March : गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुन्हा एकदा सोन्याचा दर विक्रमी दराकडे वाटचाल करत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्याने 58,500 रुपये आणि चांदी 71,000 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र यानंतर सोन्याचा भाव 3000 रुपयांनी तर चांदीचा भाव 8000 रुपयांनी कमी झाला. आता पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढताना दिसत आहेत.
सोन्या-चांदीत चढ-उतार
येत्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी वाढ होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोन्याचा भाव 65,000 रुपये आणि चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांत ५८,५०० रुपयांचा उच्चांक गाठलेले सोने पुन्हा ५७,००० रुपयांच्या वर चढले आहे. चांदीच्या दरातही तेजी आली असून तो 66,000 च्या जवळ पोहोचला आहे. जागतिक बाजारातील मंदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दोन्ही दरात चढ-उतारांचा काळ आहे.
MCX वर संमिश्र कल
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. गेल्या काही दिवसांत ५८,००० रुपयांच्या पुढे गेलेले सोने बुधवारी ६६ रुपयांच्या घसरणीसह ५७४१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. गेल्या काही दिवसांत चांदीने 71,000 चा टप्पा पार केला होता. बुधवारी तो 273 रुपयांनी घसरून 66683 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. याआधी मंगळवारी सोन्याचा भाव 57483 रुपये आणि चांदीचा भाव 66956 रुपये किलोवर बंद झाला होता.
सराफा बाजारात चांदी वाढली, सोनं घसरलं
बुधवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला. सोन्यामध्ये घसरण आणि चांदीमध्ये वाढ झाली. इंडिया बुलियन्स असोसिएशन ( https://ibjarates.com ) ने जाहीर केलेल्या किमतीनुसार , 24 कॅरेट सोन्याचा भाव 104 रुपयांनी घसरून 57501 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीच्या दरात 188 रुपयांची वाढ होऊन तो 66364 रुपये प्रति किलोवर पोहोचला.