मुंबई: आज तुम्ही सराफा बाजारात सोन्याची खरेदी करायचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता तुम्ही सोने खरेदी करून मोठी बचत करू शकता. सध्या बाजारात सोन्याची खरेदी कमी होत आहे, परंतु ज्यांच्या घरात लग्न आहेत ते सोने खरेदी करत आहेत.
जर तुमच्या घरात देखील लग्न सोहळा असेल तर सोने खरेदी करून बचत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. बाजारात सोने सर्वाधिक किमती पेक्षा जवळपास 3800 रुपये स्वस्त विकलेल्या जात आहे.
मीडियाच्या रिपोर्ट नुसार जर तुम्ही आता सोने खरेदी केले नाही तर नंतर पच्छाताप करावा लागू शकतो कारण येत्या काळात सोने महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात 22 कैरेट सोन्याचा भाव 10 ग्राम साठी 51,050 रुपये नोंदवला गेला आहे. काल गोल्ड प्राईज 51,450 रुपये नोंदवली गेली होती.
आजचा सोन्याचा भाव 400 रुपयांनी कमी झाला आहे. 24 कैरेट सोन्याचा आजचा भाव 55,680 रुपये प्रति 10 ग्राम नोंदवला गेला.