Gold Price Today: सोने 30 महिन्यात आज सर्वाधिक महाग, मोडू शकतो हा रेकॉर्ड, पहा 10 ग्राम सोन्याची किंमत

Gold Price Today: सोन्याची किंमत (Gold Price) आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारात वाढले आहेत. ज्याचा परीणाम सामान्य सोने ग्राहकांवर पडणार आहे.

दररोज बदलणाऱ्या सोन्याच्या किमती ने आता मागील 30 महिन्याचा रेकॉर्ड मोडून उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोने मागील 30 महिन्यात सर्वाधिक महाग झालेला आहे.

Gold Silver Price Update

गुडरीटर्न वेबसाईट नुसार आज सोन्याचा भाव पुन्हा प्रति 10 ग्राम 150 रुपयांनी वाढला आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत भारता मध्ये सरासरी 51,100 रुपये (Updated Gold Price) आहे. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२० रुपये आहे.

परंतु प्रत्येक शहारा मध्ये थोडाफार प्रमाणात सोन्याच्या किमती मध्ये फरक असतो. चला जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आजचा सोन्याचा भाव (New Gold Price).

गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबई आणि आजूबाजूच्या शहारा मध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,१०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५५,७५० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्याच्या सोने बाजारा मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,१०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,७५० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,१०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,७५० रुपये इतका असेल.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,१३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,७५० रुपये आहे.

Follow us on

Sharing Is Caring: