Gold Price 26th May: सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. घसरणीचा कल असा आहे की गेल्या 20 दिवसांत चांदीचा भाव 7000 रुपयांनी तर सोन्याचा भाव 17000 रुपयांनी घसरला आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर लोक खूप खूश आहेत. सराफा बाजाराबरोबरच एमसीएक्समध्येही किमतीबाबत अनिश्चितता आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सराफा बाजारात पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, मल्टी-कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर किमतीत तेजी आहे. तुम्हाला दागिने घ्यायचे असतील, तर बाजारभावानुसार ही वेळ योग्य आहे.
दिवाळीत सोन्या-चांदीत अधिक तेजी!
बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यावेळी सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी तेजी दिसून आली.
MCX वर, सोने 60,000 रुपयांच्या खाली आणि चांदी 71,000 रुपयांच्या खाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा भाव 513 रुपयांनी वाढून 70755 रुपयांवर तर सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 59560 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी गुरुवारी सोने 59460 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 70242 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
चांदीच्या दरात 7000 रुपयांची घसरण
सराफा बाजारात 5 मे रोजी सोन्याचा दर 61739 रुपयांवर तर चांदीने 77280 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. आता 26 मे च्या दरानुसार सोने 1700 रुपयांनी तर चांदी 7000 रुपयांनी घसरली आहे. सराफा बाजाराचे दर https://ibjarates.com वर प्रकाशित केले आहेत.
शुक्रवारी दुपारी जाहीर झालेल्या दरानुसार सोन्याचा भाव 300 रुपयांहून अधिक घसरून 60052 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही सुमारे 100 रुपयांची घसरण दिसून आली आणि ती 70191 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
शुक्रवारी 23 कॅरेट सोने 59812 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 55008 रुपये आणि 20 कॅरेट सोने 45039 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके स्वस्त झाले.