Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. गुरुवारी सराफा बाजाराबरोबरच मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही घसरण दिसून येत आहे. शेवटच्या दिवसांत सोन्याचा भाव 58,000 रुपयांपर्यंत तर चांदीचा भाव 68,000 रुपयांच्या पातळीवर आला.
एमसीएक्सने घसरणीचा कल दर्शविला
व्यापार सत्रादरम्यान, गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. दुपारी सोन्याचा भाव 112 रुपयांनी घसरून 58,976 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 292 रुपयांनी घसरून 72,180 रुपये प्रतिकिलो झाला. याआधी बुधवारी एमसीएक्सवर सोने 59088 रुपये आणि चांदी 72472 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
सराफा बाजारात घसरण:
सराफा बाजाराचे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे जारी केले जातात. IBJA ने गुरुवारी दुपारी https://ibjarates.com या वेबसाइटवर जाहीर केलेल्या दरांनुसार सोन्या-चांदीत घसरण दिसून आली.
गुरुवारी सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरून 59125 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आणि चांदी जवळपास 900 रुपयांनी घसरून 71180 रुपये प्रति किलो झाली.
याआधी बुधवारी सोने 59329 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 72065 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 58888 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 54159 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा दर 44344 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 34588 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.