Gold Price 28th March : सोन्या-चांदीच्या दरात काही काळापासून चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये प्रचंड वाढ दिसून आली. मात्र त्यानंतर त्यात घट झाली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 चा विक्रम करणाऱ्या सोन्याने या वर्षी एकदा 60,000 चा टप्पा पार केला. मात्र आता त्यात पुन्हा घट दिसून येत आहे. यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर 65,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमतही 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
4000 रुपये प्रति 10 ग्राम तेजी
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 4,000 रुपयांनी वाढून 55,000 रुपयांवर पोहोचला होता. पण आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ते 59,000 च्या आसपास चालू आहे. म्हणजेच एका महिन्यातच सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीअखेर चांदी 61,000 रुपयांच्या पातळीवर घसरली. मात्र आता त्यातही तेजी दिसून येत असून सुमारे 70 हजार रुपयांच्या जवळपास ट्रेंड करत आहे. जागतिक बाजारात मंदीची भीती असताना सोन्या-चांदीत चढ-उतारांचा काळ आहे.
MCX वर सोन्या-चांदी तेजी
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर मंगळवारी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. मंगळवारी सकाळी सोन्याचा भाव 92 रुपयांनी वाढून 58618 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला तर चांदी 48 रुपयांच्या वाढीसह 70190 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. याआधी सोमवारी सोने 58526 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 69926 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
सराफा बाजारात सोने आणि चांदी मध्ये तेजी
सराफा बाजारातील किमती इंडिया बुलियन्स असोसिएशन ( https://ibjarates.com ) द्वारे दररोज जारी केल्या जातात . सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५८८९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. सोमवारी चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आणि तो 69369 रुपये प्रति किलोवर बंद झाला. सोमवारी संध्याकाळी 23 कॅरेट सोन्याचा भाव 58657 रुपये, 22 कॅरेट 53945 रुपये आणि 20 कॅरेटचा दर 44169 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.