Gold Latest Price Today : सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांना धक्का, सोने-चांदी दरात विक्रमी वाढ; नवीनतम दर जाणून घ्या

Gold-Silver Price Today : येणाऱ्या काळात चांदी ८०,००० रुपये प्रतिकिलो आणि सोन्याचा भाव ६५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याचा दर ज्या वेगाने वाढत आहे, त्यावरून असे दिसते की सोने लवकरच तज्ज्ञाने सांगितलेल्या दरापर्यंत पोहोचेल.

Gold Price 12th April : मागील काही दिवसांत वेगाने विक्रम करणारे सोने आणि चांदी सातत्याने नवनवे विक्रम करत आहेत. चढ-उताराच्या दरम्यान बुधवारी चांदीने नवा विक्रम गाठला आहे. चांदीचा भाव 75000 रुपयांच्या वर पोहोचला आहे. सोने पुन्हा 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले आहे. येत्या काळात चांदी 80,000 रुपये प्रति किलो आणि सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांना आहे. सोन्याचा दर ज्या वेगाने वाढत आहे, त्यावरून असे दिसते की सोने लवकरच तज्ज्ञाने सांगितलेल्या दरापर्यंत जाईल.

सोने आणि चांदीचे नवीनतम दर

बुधवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास एमसीएक्सवर सोन्याचा भाव 365 रुपयांनी वाढून 60870 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 903 रुपयांनी वाढून 75943 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

याआधी मंगळवारी चांदीचा भाव 75040 रुपये आणि सोन्याचा दर 60505 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. व्यवहारादरम्यान सोन्याचा भाव 60950 रुपयांच्या तर चांदीचा भाव 76009 रुपयांपर्यंत गेला.

सराफा बाजारातही तेजी कायम

सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. मंगळवारीही बाजार तेजीत बंद झाला. मंगळवारी संध्याकाळी संपलेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 60,390 रुपये आणि चांदी 74,416 रुपये प्रति किलोवर पोहोचली. मंगळवारी संध्याकाळी इंडिया बुलियन्स असोसिएशन ( https://ibjarates.com ) ने जाहीर केलेल्या किमतीनुसार , 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 60390 रुपये आणि चांदी प्रति किलो 74416 रुपये झाली.

याशिवाय 23 कॅरेट सोन्याचा भाव 60148 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 55317 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा भाव 45293 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

Follow us on

Sharing Is Caring: