EPFO चा मोठा निर्णय: आता पीएफ खात्यातून थेट 1 लाख रुपये मिळवा – जाणून घ्या कसा फायदा घेता येईल!

EPFO खातेधारकांसाठी धक्कादायक संधी! आता तुमच्या PF खात्यातून थेट 1 लाख रुपये काढण्याची मुभा – आजच जाणून घ्या या सुवर्णसंधीचा फायदा कसा घ्यायचा!

On:
Follow Us

EPFO Update: ईपीएफओ (EPFO) खातेदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता, पीएफ खातेधारक आजारपणासाठी 1 लाख रुपयेपर्यंतची रक्कम काढू शकतात. यापूर्वी फक्त 50,000 रुपये काढण्याची मर्यादा होती, पण आता हा नियम बदलण्यात आला आहे.

EPFO च्या नवीन नियमांचा फायदा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) या नवीन नियमांमुळे खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे. हा बदल ईपीएफ फॉर्म 31 अंतर्गत करण्यात आला आहे. हा नियम 16 एप्रिल 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार लागू झाला आहे.

1 लाख रुपये काढण्याची संधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत, पॅरा 68J नुसार, कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे काढले जाऊ शकतात. जर कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती 1 महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल असेल किंवा टीबी, कर्करोग, मोठ्या शस्त्रक्रिया अशा गंभीर परिस्थितीत असेल, तर खातेधारकांना 1 लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी मिळते. जर तुमच्या पीएफ खात्यात 1 लाखांपेक्षा कमी रक्कम असेल, तर तुमच्या शिल्लक रकमेवर आधारित रक्कम काढता येईल.

EPFO मधून पैसे काढण्याची प्रक्रिया

ईपीएफओमधून पैसे काढण्यासाठी खातेधारकांनी EPFO फॉर्म 31 भरावा लागतो. हा फॉर्म तुम्हाला लग्न, घर खरेदी, घर बांधकाम, किंवा वैद्यकीय खर्चांसाठी पैसे काढण्यासाठी वापरता येईल. पैसे काढण्यासाठी वैद्यकीय कागदपत्रं कंपनीकडे सादर करावी लागतात.

पैसे काढण्याचे नियम

EPFO अंतर्गत, वैद्यकीय खर्चाशिवाय, खातेधारकांना इतरही अनेक कारणांसाठी पैसे काढता येतात. घर खरेदी, गृहकर्ज फेडणे, मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा अपंग व्यक्तींसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे काढता येतात.

Manoj Sharma

My Name is Manoj Sharma, I Work as a Content Writer for marathigold.com and I like Writing Articles.

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel