Coca Cola : या जगात खूप कमी लोक असतील ज्यांनी आयुष्यात कधीही कोका-कोला प्यायला नसेल. 8 मे 1886 रोजी कोका-कोला पहिल्यांदा विकला गेला. 1890 पर्यंत, कोका-कोला (Coca-Cola) हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पेय बनले होते. हे बऱ्याच काळापासून जगभरातील लोकांचे आवडते शीतपेय आहे. या कोल्ड्रिंकची बाटलीही खास आहे. त्याची रचना अनेक वेळा बदलली आहे.
पण एक गोष्ट कधीच बदलली नाही. ते म्हणजे लाल रंगाचे झाकण (कॅप). कोका-कोलाच्या बाटलीच्या झाकणाचा रंग लाल राहिला. पण तुम्हाला माहित आहे का की कोका-कोला देखील पिवळ्या झाकणा मध्ये येते? होय हे खरे आहे. कोका-कोला वर्षातून एकदा पिवळ्या झाकणासह कोका-कोला रिलीज करते. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.
कारण धर्माशी संबंधित आहे-
कोका-कोलाच्या बाटलीच्या पिवळ्या झाकणामागील कारण धर्माशी संबंधित आहे. कोकच्या बाटलीच्या पिवळ्या झाकणामागे यहुदी धर्म (Judaism) आहे. यहुदी धर्मात काही असा असतो जेव्हा ते कॉर्न, गहू, राई, बीन्स इत्यादी खात नाहीत. याला Passover म्हणतात. ही वेळ वसंत ऋतूमध्ये येते. सामान्य कोका-कोला कॉर्न सिरपपासून बनवले जाते. Passover च्या वेळी यहुदी लोक ते पिऊ शकत नाहीत.
कॉर्नशिवाय कोका-कोला
ज्यू लोकांना लक्षात घेऊन कंपनी या काळात कॉर्नशिवाय कोका-कोला बाजारात आणते. त्याला कोशर कोक (Kosher Coca-Cola) म्हणतात. हे यहुदी धर्माचे नियम लक्षात घेऊन बनवले आहे. बाटलीला वेगळी ओळख देण्यासाठी त्यावर पिवळी कॅप लावली जाते. ज्यू लोक Passover च्या वेळी हा कोका-कोला वापरतात.
चव सामान्य कोकपेक्षा वेगळी असते-
कोशर कोकची चव सामान्य कोकपेक्षा वेगळी असते. त्याची चव चांगली आहे. विशेष म्हणजे त्याची किंमत सामान्य कोक सारखीच आहे. आता कुठेतरी पिवळ्या रंगाचे झाकण असलेली कोका कोलाची बाटली दिसली तर समजून घ्या की ती कोशेर कोक आहे.