Business Idea : या उत्पादनाला दररोज मागणी आहे, दरमहा लाखोंची कमाई होईल, जाणून घ्या सुरुवात कशी करावी

Business Idea : या बिजनेस मध्ये तयार होणाऱ्या प्रोडक्ट्ची मागणी लहान शहरे असो वा मोठी शहरे सगळीकडे राहते. अगदी कमी पैसे गुंतवून तुम्ही त्याचा कारखाना उघडू शकता

Business Idea : जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरु करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. हा असा व्यवसाय आहे. ज्यामध्ये उत्पादनाची मागणी प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये राहते. गाव असो वा शहर, या उत्पादनाला प्रचंड मागणी आहे. आम्ही साबण बनवण्याच्या कारखान्याबद्दल म्हणजे साबण मैन्युफैक्चरिंग (soap manufacturing) यूनिट बद्दल बोलत आहोत. या व्यवसायात मशिनच्या मदतीने साबण बनवले जातात. ते बाजारात पोहोचवले जातात. मात्र, अनेकजण हाताने साबण बनवून बाजारात विकतात. चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणातही सुरू करता येतो.

आजच्या काळात साबणाची मागणी लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत, गावांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अगदी कमी पैशात तुम्ही साबणाचा कारखाना उघडू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 80 टक्के कर्ज घेऊ शकतात. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत.

कर्ज मिळेल

साबण मैन्युफैक्चरिंग (soap manufacturing) यूनिट उभारण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च केले जातात. यामध्ये युनिट स्पेस, मशिनरी, तीन महिन्यांचे खेळते भांडवल यांचा समावेश आहे. या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता. साबण बनवण्याचे युनिट सेट करण्यासाठी तुम्हाला एकूण 750 चौरस फूट जागा लागेल. यामध्ये 500 चौरस फूट जागा झाकून उर्वरित जागा उघडी पाहिजे. यामध्ये सर्व प्रकारच्या मशिन्ससह 8 प्रकारची उपकरणे असतील. प्रकल्प अहवालानुसार ही यंत्रे बसवण्यासाठी एकूण एक लाख रुपये इतकाच खर्च येणार आहे.

भारतातील साबण बाजाराच्या कैटेगरी

साबण बाजार त्याच्या वापराच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला जाऊ शकतो. जसं की-

लॉन्ड्री सोप (Laundry Soap)

ब्यूटी सोप (Beauty Soap)

मेडिकेटेड सोप (Medicated Soap)

किचन सोप (Kitchen Soap)

परफ्यूम्ड सोप (Perfumed Soap)

मागणी आणि बाजारपेठ लक्षात घेऊन तुम्ही तुमची उत्पादने यापैकी कोणत्याही श्रेणीनुसार तयार करू शकता.

जाणून घ्या किती होईल कमाई?

केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या प्रकल्प प्रोफाइलनुसार, तुम्ही 1 वर्षात एकूण 4 लाख किलो उत्पादन करू शकाल. त्याची एकूण किंमत सुमारे 47 लाख रुपये असेल. व्यवसायातील सर्व खर्च आणि इतर दायित्वे विचारात घेतल्यानंतर, तुम्हाला 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा होईल, म्हणजे दरमहा 50,000 रुपये.

Follow us on

Sharing Is Caring: