Mushroom Farming Business : तुम्ही कोणताही बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. हा बिजनेस तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता. आम्ही तुम्हाला ज्या बिझनेसबद्दल सांगणार आहोत, त्यामध्ये कमी गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त तुम्ही उत्तम प्रकारे कमाई देखील करू शकता.
बिझनेसच्या एक्सपेंशन वर अवलंबून, तुम्ही एकावेळी महिन्याला 10 लाख रुपये देखील कमवू शकता. बाजारात त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या कमी किमतीच्या बिझनेसाच्या कामगिरीवर तुमचा सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण त्यातून मिळणारा नफा तुमच्या मनाला आनंद देईल.
10 पट प्रॉफिट होऊ शकतो
मशरूम फार्मिंग (How to do Mushroom Farming) एक फायदेशीर बिझनेस आहे. यामध्ये खर्चाच्या 10 पट नफा (Profit in mushroom Farming) मिळू शकतो. म्हणजे 1 लाख रुपये गुंतवून तुम्ही 10 लाख रुपये कमवू शकता. गेल्या काही वर्षांत मशरूमची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्हाला मशरूम लागवडीसाठी काय करावे लागेल? जाणून घेऊ.
Business Idea : ‘या’ बिजनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आणि प्रॉफिट जास्त, कसे सुरू करायचे जाणून घ्या
40-50 दिवसात मशरूम तयार होतो
बटन मशरूमला पार्टी आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वाधिक मागणी आहे. मशरूम करण्यासाठी गहू किंवा तांदळाच्या भूस्या मध्ये काही केमिकल्स मिसळून कंपोस्ट तयार केले जाते. कंपोस्ट तयार होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. यानंतर, पृष्ठभागावर 6-8 इंच जाडीचा थर पसरवून मशरूमच्या बिया लावल्या जातात. बिया कंपोस्टने झाकल्या जातात. 40-50 दिवसांत मशरूम कापल्यानंतर विक्रीयोग्य होते. मशरूमच्या लागवडीसाठी, आपल्याला शेड वाली जागा आवश्यक आहे.
Business Ideas : फक्त 2 तास बिजनेस करून कमाई महिन्याला 30 हजार रुपये, गुंतवणूक 50 हजार मात्र
इनवेस्टमेंट किती असेल
एक लाख रुपयांपासून मशरूम लागवड सुरू करून चांगला नफा मिळवता येतो. एक किलो मशरूमच्या उत्पादनावर 25-30 रुपये खर्च येतो. बाजारात ते 250 ते 300 रुपये किलोने विकले जाते. मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये चांगल्या दर्जाच्या मशरूमचा पुरवठा केल्यास 500 रुपये प्रति किलोपर्यंत किंमत मिळू शकते.
डिस्क्लेमर- येथे फक्त बिझनेस सुरू करण्याच्या कल्पनेबद्दल माहिती दिली आहे. कोणताही बिझनेस सुरू करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. यासह, नफ्याचे आकडे तुमच्या बिझनेसाच्या विक्रीवर अवलंबून राहतील.