Bank of India ने ग्राहकांना दिली मोठी दिलासा देणारी बातमी; विविध कर्जांवरील व्याज दर कमी, सेविंग अकाउंटवरील मिनिमम बॅलन्सचा दंड रद्द
Bank of India ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली असून, 7 जुलै 2025 पासून विविध कर्जांवरील व्याज दरात कपात केली आहे. या निर्णयाचा फायदा थेट सामान्य नागरिकांना होणार असून बँकेच्या सेवा अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत.
होम लोन अधिक स्वस्त
बँकेने होम लोनवरील व्याज दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.50% इतकी कपात केली आहे. आता नवीन व्याज दर 7.35% पासून सुरू होईल आणि तो ग्राहकाच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून असेल. हा दर नव्या आणि चालू कर्जांवरही लागू होणार आहे.
एज्युकेशन लोनसाठी चांगली बातमी
देशातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन लोन आता फक्त 7.5% वार्षिक व्याज दराने मिळेल. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेणे अधिक सुलभ होणार आहे.
वाहन आणि इतर रिटेल कर्जही स्वस्त
कार लोन आणि अन्य रिटेल कर्जांवरही बँकेने 50 बेसिस पॉइंट्सनी व्याज दर कमी केला आहे. यामुळे ग्राहकांसाठी वाहन किंवा वैयक्तिक गरजांसाठी कर्ज घेणे आता पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहे.
सेविंग अकाउंटवरील मिनिमम बॅलन्सचा दंड रद्द
Bank of India ने सेविंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास लागणारा अतिरिक्त दंड पूर्णपणे हटवला आहे. यामुळे खात्यात किमान रक्कम नसल्यानं आता कोणताही चार्ज लागणार नाही.
ग्रीन डिपॉझिटवर व्याज दरात घट
999 दिवसांच्या ग्रीन डिपॉझिट योजनेवरील व्याज दर 7% वरून 6.7% करण्यात आला आहे. हा दर 1 लाख ते 10 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी लागू आहे. तसेच 1 लाख रुपयांपर्यंतच्या सेविंग डिपॉझिटवरील व्याज दर 2.75% वरून 2.5% करण्यात आला आहे.
बदलामागील कारण
Bank of India ने सांगितले की, हे बदल RBI च्या व्याज दरांमध्ये झालेल्या अलीकडील घटीनंतर करण्यात आले आहेत. बँकेचा उद्देश आहे की, ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी आणि कर्जवाढीस चालना मिळावी.
Disclaimer: वरील माहिती अधिकृत स्त्रोतांवर आधारित असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती घ्यावी.

