Bank Job : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केले आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार IDBI च्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात.
IDBI ने गट B, C आणि D पदांसाठी एकूण ११४ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवार २१ फेब्रुवारी २०२३ पासून थेट https://www.idbibank.in/ या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. (Bank Job in IDBI)
याशिवाय, उमेदवार अर्ज करण्यापूर्वी https://www.idbibank.in/pdf या लिंकद्वारे या पदांशी संबंधित अधिकृत जाहिरात (IDBI Recruitment 2023) पाहू शकतात. उमेदवार IDBI मध्ये अधिकाऱ्यांच्या पदांसाठी ३ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.
रिक्त पदांची संख्या
>> व्यवस्थापक (ग्रेड बी) : ७५
>> असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) (ग्रेड C) – २९
>> डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) (ग्रेड डी) – १०
>> डिजिटल बँकिंग आणि इमर्जिंग पेमेंट्स (DB&EP) – ५१
>> माहिती तंत्रज्ञान आणि MIS – ६३
>> एकूण पदांची संख्या : २२८
महत्त्वाच्या तारखा
>> ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : २१ फेब्रुवारी २०२३
>> ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ मार्च २०२३
वयोमर्यादा
>> डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) (ग्रेड डी) साठी वयोमर्यादा : किमान ३५ वर्षे आणि कमाल ४५ वर्षे
>> सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) (ग्रेड सी) साठी वयोमर्यादा : किमान २८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे
>> व्यवस्थापक (ग्रेड बी) : किमान २५ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे
अर्ज फी
>> Gen/OBC/EWS साठी अर्ज फी : रु. १ हजार
>> अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – २०० रुपये
पगार-
तुम्हाला पदानुसार ४८ हजारांपासून ते ९० हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.