8th Pay Commission: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे. ताजी माहिती अशी आहे की, याच बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या गठनावर शिक्कामोर्तब होणार आहे. सध्या ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे, तरीही अधिकृत घोषणा बाकी आहे.
आठवा वेतन आयोग फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्याची चर्चा सुरू आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन 51,400 रुपयांपर्यंत वाढणार आहे. विभागीय सूत्रांचे म्हणणे आहे की, त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि घोषणा केवळ औपचारिकता उरली आहे. मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीही सांगणे घाईचे ठरेल.
फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर सहमती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त सल्लागार समितीच्या राष्ट्रीय परिषदेने सरकारकडे 8व्या वेतन आयोगाबरोबरच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे. सध्या 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरचा दर 2.57 आहे, जो आता 2.86 पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे.
फिटमेंट फॅक्टरच्या आधारेच वेतन आयोग लागू केला जातो आणि पगार व पेन्शनमध्ये वाढ होते. जर सरकार 2.86 च्या प्रस्तावावर सहमती दर्शवते, तर बेसिक सॅलरी 8,000 रुपयांवरून थेट 51,480 रुपयांपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ सॅलरीत जवळपास तीनपट वाढ होईल.
पेन्शनधारकांनाही मिळणार फायदा
8वा वेतन आयोग लागू झाल्यावर फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही, तर निवृत्तीनंतर पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे. सध्या किमान पेन्शन 9,000 रुपये आहे, जी 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार वाढून 25,740 रुपये होईल. हा हिशोब फक्त किमान बेसिक सॅलरी आणि पेन्शनसाठी आहे. अलीकडेच सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% डीए दिला जात आहे.