money

Business Ideas Under 5 Lakh Investment Marathi पाच लाख रुपया पेक्षा कमी गुंतवणुकीच्या बिजनेस आयडिया

Business Ideas Under 5 Lakh Investment – Marathi : काय तुम्हाला असे बिजनेस माहित आहेत का जे 5 लाख रुपयाच्या गुंतवणूकी मध्ये सुरु केले जाऊ शकतात? जर नाही तर आज आम्ही तुम्हाला या बद्दल सांगत आहोत. चांगल्या बिजनेस आयडिया मधून किती पैसे कमवले जाऊ शकतात याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही कारण एखादी चांगली बिजनेस आयडिया तुम्हाला मिळाली तर ती तुम्हाला लाखो रुपये नाही तर करोडो रुपये देखील कमावून देऊ शकते. पण यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती निर्णय घेण्याची क्षमता आणि उद्योग वाढवण्यासाठी गुण असले पाहिजेत. ही क्षमता आणि बिजनेसचे गुण तुम्ही कधीही शिकू शकता हे जन्मतः असण्याची किंवा यासाठी तुम्ही एखाद्या उद्योजकाच्या घरी जन्म घेण्याची गरज नाही. चला तर पाहू कोणकोणते बिजनेस तुम्ही Under 5 Lakh Investment सुरु करू शकता.

फूड डिलिवरी बिजनेस

फूड डिलिवरी बिजनेस म्हणजे आम्ही अश्या उद्योगा बद्दल बोलत आहोत कि ज्यामध्ये उद्योजक अन्न पदार्थाची घरा पर्यंत डिलिवरी देण्याची जबाबदारी घेतो आणि त्यास व्यवस्थित पूर्ण करतो. सुरुवातीस उद्योजकाने आपल्या स्थानिक बाजारपेठेस लक्षात घेऊन हा बिजनेस केला पाहिजे. याचा अर्थ असा कि आपल्या स्थानिक बाजार पेठेत रिसर्च करणे आवश्यक आहे एरिया मध्ये किती फूड आउटलेट आहेत आणि लोकांची घर किंवा ऑफिस मध्ये फूड डिलिवरी मागवण्याची सवय आहे किंवा नाही. सुरुवातीस हा बिजनेस तुम्ही दोन डिलिवरी बॉय सोबत हा बिजनेस म्हणजेच फूड डिलिवरी बिजनेस पाच लाखांच्या पेक्षा कमी गुंतवणुकीत म्हणजेच 2.5 लाख ते 3 लाख रुपयात करू शकता.

वेडिंग प्लानिंग बिजनेस

पाच लाखांच्या आत गुंतवणूक असलेला हा बिजनेस व्यक्तीच्या त्या आवश्यकते बद्दल आहे ज्यास पूर्ण करण्यासाठी लोक आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्यास तयार असतात कारण त्यांचे हे कार्य यशस्वी पणे पूर्ण व्हावे. घरामध्ये जर एखाद्याचे लग्न होणार असेल तर संपूर्ण कुटुंब या टेंशनमध्ये असते कि सर्व कामे कशी पूर्ण होतील. जसेकी भारता मध्ये लग्न समारंभात भरपूर खर्च केला जातो आणि विविध गोष्टी पार पडण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने. ज्यामुळे ज्या लोकांकडे वेळेची कमी असते किंवा कामे पूर्ण करण्यासाठी कुशल अश्या माणसांची कमी असते तेव्हा लोक एखाद्या अनुभवी वेडिंग प्लानरकडे ही जबाबदारी देऊन निश्चिंत राहतात. ज्यामुळे त्यांना कोणत्याही लहान मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत नाही आणि वेडिंग प्लानर ही सर्व कामे जबाबदारीने पूर्ण करतो.

हाउसकीपिंग सर्विस बिजनेस

सध्या अनेक ऑफिस मध्ये आणि हॉटेल मध्ये हाउसकीपिंगची आवश्यकता असते. यासाठी व्यक्तीला जर मैनेजमेंट इत्यादीचे ज्ञान असेल तर तो हा हाउसकीपिंग बिजनेस पाच लाख रुपया पेक्षा कमी गुंतवणुकीत सुरु करू शकतो. यासाठी तुम्हाला हॉटेल आणि ऑफिस मैनेजर सोबत चर्चा करून काम मिळवण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सफाई कर्मचारी कामास ठेवून त्यांच्या कडून काम करून घ्यावे लागते. त्यामुळे उत्तम कम्युनिकेशन आणि मैनेजमेंट केल्यास कमी खर्चात जास्त फायदा मिळवून देणारा हा बिजनेस आहे.

पाण्याचे टैंक स्वच्छ करण्याचा बिजनेस

हा बिजनेस पाच लाख रुपया पेक्षा कमी गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाची गरज पडेल. तसेच  घर, बिल्डिंग, कमर्शियल काम्प्लेक्स, हॉस्पिटल, होटल, स्कूल, कॉलेज जेथे पाण्याच्या टैंक असतात तेथे संपर्क करून कामाचा ठेका घ्यावा लागेल. टैंक स्वच्छ करण्यासाठी वेक्यूम क्लीनर, संक्सन पंप, हाई प्रेशर जेट इत्यादी उपकरणांची गरज पडेल.

या सोबतच अनेक असे बिजनेस आहेत जे पाच लाख रुपया पेक्षा कमी गुंतवणुकीत केले जाऊ शकतात. तुम्हाला त्या बिजनेसची देखील माहिती पाहिजे असल्यास आम्हाला कमेंट मध्ये लिहा.

Tags

Related Articles

Back to top button