Breaking News

मेहनत करून देखील लाभ होत नसेल तर बुधवारी करा हे उपाय…

गणपती ची पूजा करण्यासाठी बुधवार हा विशेष दिवस मानला जातो. असे म्हणतात की ज्या लोकांवर गणेश जीची कृपा राहते, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही समस्या उद्भवत नाही. त्याच्या आशीर्वादाने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात.

गणेशाची प्रथम पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित अडचणी उद्भवू नयेत आणि तुमच्या प्रयत्नांचे फळ  तुम्हाला मिळावे  असेल तर बुधवारी तुम्ही गणेशासाठी काही खास उपाय करू शकता. या उपायांचा अवलंब केल्याने तुमचे नशीब सुधारेल आणि तुम्हाला लवकरच पैसे मिळतील.

  • तुम्हाला पैशाचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी बुधवारी भगवान श्री गणेशचा अभिषेक दुधात केशर मिसळून केल्यास लाभ होतो.
  • पैशाच्या बाबतीत अडचणीं पासून मुक्त होण्यासाठी आपण बुधवारी गायीला हिरवा चारा खाण्यास दिला पाहिजे. हा उपाय केल्यास पैशाशी संबंधित समस्या दूर होईल आणि तुमची व्यवसायातही प्रगती होईल.
  • आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बुधवारी शिवलिंगावर बेल पत्र अर्पण करावीत.
  • जर आपण अनेक प्रयत्न करीत असाल, परंतु तरीही आपल्याला धन लाभ मिळत नसेल तर आपण बुधवारी निश्चितपणे हा उपाय अवलंबिला पाहिजे. तुम्ही बुधवारी 11 नारळांचे तोरण गणपतीला अर्पण करा. या उपायाचा अवलंब केल्यास धन लाभ मिळण्याचे योग तयार होतील.
  • आपल्या आयुष्यात अनवधानाने व नकळत केलेल्या पापांपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर बुधवारी गणेश सहस्त्रनामचा जप केला पाहिजे.

व्यवसायात प्रगती करण्यासाठी : आपल्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल किंवा व्यवसायात तोटा होत असेल तर अशा स्थितीत बुधवारी व्यवसायाच्या ठिकाणी गणपती आणि श्री यंत्र स्थापित करावा. या उपायाचा अवलंब केल्यास व्यवसायाशी संबंधित सर्व अडचणींवर मात करता येईल आणि तुम्हाला व्यवसायात प्रगती होत असल्याचे दिसून येईल.

बुध ग्रह मजबूत करण्यासाठी : जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध नीचेचा असेल किंवा जर बुध ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर आपण बुधवारी शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण करावे. या उपायाचा अवलंब केल्यास बुध ग्रह प्रबळ होतो. याशिवाय बुधवारी रामायणातील किस्किंधा कांड वाचला तर बुध ग्रहालाही बळ मिळते.

लग्नाशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी : वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास बुधवारी हळद लावून गणेशाला 11 दुर्वा हळद लावून अर्पण करा. हा उपाय केल्याने विवाहाशी संबंधित अडथळे दूर होतात.

About Marathi Gold Team