astrology

माता लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर 30 एप्रिल रोजी सकाळी करा हे उपाय, होईल धनवर्षा

हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व आहे. कारण या दिवसाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो. बुध्द पौर्णिमेचा दिवस शुभ मानला जातो आणि जर या दिवशी काही विशेष उपाय केले गेले तर पूर्ण वर्ष सुख शांती आणि समाधान मिळेल. घरामध्ये सुख-समृद्धी बनून राहील. यावर्षी 30 एप्रिल रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. आज आम्ही तुम्हाला या दिवशी केले जाणारे उपाय सांगत आहोत ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर विशेष कृपा करेल.

तसे तर ज्योतिष शास्त्रामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी केले जाणारे अनेक उपाय सांगितले गेले आहेत जे केल्यानंतर घरावर देवी लक्ष्मी कृपा करू शकते. पण आज आम्ही तुम्हाला जे उपाय सांगत आहोत ते अत्यंत सोपे आणि अचूक उपाय आहेत. त्यांना सांगण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की पोर्णिमा जागृती आणि सौभाग्यप्राप्तीचा दिवस आहे. त्यामुळे यादिवशी विषय सावधानी ठेवली पाहिजे कारण या दिवशी केलेली एक चूक माता लक्ष्मीला नाराज करू शकते. त्यासाठी या दिवशी स्वच्छता आणि शुभता याकडे विशेष लक्ष द्यावे आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांची पुजा-अर्चना करावी. चला तर पाहूया माता लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत.

सर्वात पहिले बुद्ध पौर्णिमा या दिवशी सकाळी लवकर उठून साफसफाई विशेषत्वाने घराबाहेरील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे माता लक्ष्मीला घरात प्रवेश करताना स्वच्छ दिसले पाहिजे. यानंतर स्नान इत्यादी दैनिक कार्य केल्यानंतर कपडे परिधान करावे त्यानंतर एक स्वच्छ भांड्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडे पाणी एकत्र करून मिश्रण बनवावे त्यानंतर या मिश्रणाला वापरून घराच्या मुख्य द्वारावर स्वास्तिक बनवावे आणि त्यावर कुंकू तांदूळ वाहावेत. असे केल्याने माता लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यासाठी निमंत्रण मिळते आणि लक्ष्मी माताच्या आगमनामुळे घरामध्ये आनंद येतो.

यानंतर माता लक्ष्मीची विधीवत पुजा-अर्चना करावी धूप अगरबत्ती आणि श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त वाचन करावे. सोबत माता लक्ष्मीला साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा तसेच घरांमध्ये दिवसभर सुगंधी वातावरण राहील याची काळजी घ्यावी

दिवसाची सुरुवात माता लक्ष्मीची पूजा करून केल्यानंतर घरामध्ये दिवसभर सात्विक वातावरण राहील याची काळजी घ्यावी. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या दिवशी दानधर्म यास विशेष महत्व आहे. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना यथाशक्ती दान करण्याचा प्रयत्न करावा या दिवशी आपल्या घरातून याचकास रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये.


Show More

Related Articles

Back to top button