inspirationPeople

जर बुध्दची एक गोष्ट लक्षात ठेवली तर पती-पत्नी मध्ये कधी भांडण होणार नाही

एका घरामध्ये पती-पत्नी राहत होते. त्या व्यक्तीचे आपल्या पत्नी सोबत नेहमी भांडण होत असे. रोजच्या भांडणाला कंटाळून तो सगळेकाही सोडून जंगला मध्ये निघून गेला. काही वेळ चालल्या नंतर त्यास महात्मा बुध्द आपल्या शिष्यांच्या सोबत दिसले. बुध्द आपल्या शिष्यांच्या सोबत त्याच जंगला मध्ये राहत होते. तो व्यक्ती बुद्धास गुरु मानून त्यांच्या सोबत राहू लागला.

काही दिवसानंतर बुध्द त्या व्यक्तीला म्हणाले मला तहान लागत आहे, जवळच असलेल्या नदी मधून पाणी घेऊन ये. गुरुची आज्ञा मानून तो पाणी आणण्यासाठी नदीच्या किनारी गेला.

नदीच्या जवळ गेल्यावर त्याने पाहिले जंगली प्राण्यांच्या दंगामस्तीमुळे पाणी घाण (गढूळ) झाले होते. खाली तळाला असलेली मातीवर आली होती. त्याने विचार केला असे पाणी घेऊन जाण्याचा काही फायदा नाही.

परत आल्यावर त्याने सगळे आपल्या गुरूला सांगितले. बुध्द काही वेळा नंतर पुन्हा पाणी घेऊन येण्यास सांगतात.

गुरूचा आदेश समजून तो व्यक्ती पुन्हा नदीच्या दिशेने जातो. रस्त्यामध्ये तो विचार करतो कि गुरूने विनाकारण मला पुन्हा पाठवले, पाणी तर एवढे घाण आहे कि त्यास पिणे शक्य नाही.

जेव्हा व्यक्ती नदी किनारी पोहचला तेव्हा त्याने पाहिले पाणी एकदम स्वच्छ होते, नदीतील घाण (गढूळपणा) खाली बसला होता. हे पाहून तो आश्चर्यचकीत झाला.

पाणी घेऊन तो गुरुकडे गेला. त्याने विचारले कि गुरुजी तुम्हाला कसे माहित झाले कि पाणी आता स्वच्छ मिळेल.

बुध्द त्याला म्हणाले प्राणी त्यामध्ये दंगामस्ती करत होते, यामुळे पाणी घाण झाले होते. पण काही वेळाने सगळे प्राणी तेथून निघून गेले तेव्हा पाणी शांत झाले आणि हळूहळू घाण खाली बसली.

बुध्द पुढे म्हणाले कि अगदी तसेच आपल्या सोबत होते. जेव्हा आपल्या जीवनामध्ये समस्या येतात तेव्हा आपल्या मना मध्ये अनेक विचार येतात, शांती भंग होते. अश्या स्थितीमध्येच आपण चुकीचा निर्णय घेतो. आपल्याला आपले मन शांत होण्याची वाट पाहिली पाहिजे. धैर्य ठेवले पाहिजे. शांत मनाने आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय योग्य घेऊ शकतो.

त्या व्यक्तीला लक्षात आले कि त्याने घर सोडण्याचा निर्णय अशांत मनाने घेतला होता, जो चुकीचा निर्णय आहे. त्या व्यक्तीने बुद्धा कडून घरी परतण्याची आज्ञा घेतली आणि तो आपल्या पत्नीकडे परत निघून गेला.

कथेचे सार

या कथे मधून आपल्याला शिकण्यास मिळते कि पती-पत्नी मध्ये जर वाद-विवाद झाला तर त्यावेळी दोघांनी धैर्य ठेवले पाहिजे. जेव्हा सगळे काही शांत होईल तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून येऊ लागतील आणि आपण चुकीचा निर्णय घेण्या पासून वाचू शकू. धैर्याने राहिल्यास पती-पत्नी मध्ये वाद-विवाद होण्याची स्थिती नाही बनत.


Show More

Related Articles

13 Comments

Back to top button