People
मुलाच्या तेराव्याला आईला आला अटैक, हे ऐकून मामाचा पण झाला हार्टफेल, 30 मिनिटात झाला भाऊ-बहिणीचा मृत्यू
30 मिनिटामध्ये भाऊ बहिणीचा धक्क्याने झाला मृत्यू.
आनंद (सुरत) शहरातील एक पटेल कुटुंबात 28 वर्षीय मुलाचा आकस्मित मृत्यूमुळे धक्का बसलेल्या ज्योत्सना बेन पटेल यांचा 8 एप्रिल रोज हार्टअटैक मुळे मृत्यू झाला. बहिणीच्या माहेरी पटेल कुटुंबीयांनी फोन करून रात्रीच माहीती दिली. मोठ्या बहिणीचा आकस्मित मृत्यूची बातमी मिळाल्याने रमेश पटेल (57) यांचा हार्टफेल झाला. तेही, 30 मिनिटामध्येच भाऊ-बहीण मरण पावले. हे तीनही मृत्यू हार्टअटैक मुळे झाले आहेत.
Table of Contents
असा होता घटनाक्रम
सॉफ्टवेयर इंजीनियर धवल पटेलचा 28 मार्चला हार्टअटैक मुळे मृत्यू झाला होता.
धवल-अहमदाबाद येथील कंपनी मध्ये काम करत असे. हार्टअटैक आलेल्या दिवशी तो घरी होता.
बेचैनी वाटत असल्याने ज्योत्साना बेन यांनी त्याला आधार दिला आणि डॉक्टरांना बोलावले.
डोक्यावर बाम लावल्यावर धवल आई जवळ डोके ठेवून बसला.
डॉक्टर येण्याच्या अगोदरच आई जवळ धवलने प्राण सोडले.
मुलाच्या अवेळी मृत्यूमुळे ज्योत्सना बेन यांना मोठा धक्का बसला. वडील घनश्यामभाई यांची तब्येत देखील बिघडली. परंतु घनश्यामभाईयांनी स्वताला सांभाळले.
इलाज सुरु झाला होता.
रविवारी धवलचा तेरावा होता. रात्री 10:15 वाजता ज्योत्सनाबेन यांची तब्येत पुन्हा बिघडली. पाचच मिनिटात त्यांनी प्राण सोडले.
पटेल कुटुंबाने ज्योत्सनाबेन यांच्या माहेरी फोन करून माहीती दिली. बहिणीच्या मृत्यूच्या बातमीमुळे रमेशभाई पटेल (57) यांना धक्का बसला.
रात्री 11 वाजता हार्टफेल होण्यामुळे त्यांनी देखील प्राण सोडले. फक्त 30 मिनिटात ज्योत्सनाबेन आणि त्यांचा भाऊ रमेश पटेल यांचा मृत्यू झाला.
