celebrities

भेटा या बॉलीवूड स्टार्सच्या 8 डुप्लिकेटना, 5 व्या नंबरवाला तर अगदी झेरॉक्स कॉपी आहे

असे मानले जात कि जगामध्ये एका चेहऱ्याचे 7 लोक असतात. आता हे किती खरे आहे आणि किती खोटे हे पडताळून पाहणे खरच अशक्य वाटणारी गोष्ट आहे पण एका चेहऱ्याचे दोन व्यक्ती शोधणे त्या तुलनेत अगदी शक्य आणि सोप्पे आहे. सोशल मिडियावर आजकाल बॉलीवूडच्या अश्याच 8 स्टार्स सारखे हुबेहूब दिसणारे लोक प्रसिद्ध झाले आहेत. यांना पाहिल्यावर ओरीजनल कोणता आणि ड्युप्लिकेट कोणता हे ओळखणे अवघड होते. चला पाहू कोणत्या स्टार्सचे ड्युप्लिकेट अगदी त्यांच्या सारखेच दिसतात.

करण जौहर

काही दिवसा पूर्वी करण जौहर याने आपल्या फैनची पोस्ट री-शेयर करत लिहिले होते, ‘काही ट्वीट तुम्हाला निशब्द करतात..हे देखील यापैकी एक आहे.’ करणने आपल्या या फैनच्या फोटोला लाईक देखील केले होते. या फैनचे नाव उस्मान खान आहे तो अगदी करण सारखा दिसतो.

सैफ अली खान

इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या व्यक्तीचा आणि सैफ अली खान यांचा चेहरा मिळता जुळता आहे.

सोनाक्षी सिंन्हा

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी प्रिया मुखर्जी इंस्ताग्रामवर सोनाक्षीच्या नावाने अकाऊंट चालवते. तिला चांगले वाटते जेव्हा लोक तिला सोनाक्षी बोलतात.

जितेंद्र

बॉलीवूड मध्ये जंपिंग जैक म्हणून प्रसिध्द असलेले जितेंद्र आणि अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा चेहरा जवळपास सारखाच आहे. चार्ली जितेंद्र पेक्षा जवळपास 24 वर्ष लहान आहे.

रणबीर कपूर

रणबीर कपूर आणि त्याचा सारखा दिसणारा त्याचा फैन यांचा फोटो पाहून यामधील खरा रणबीर कपूर कोण हे ओळखणे कठीण आहे. रणबीर कपूरचा फैन त्याचा अगदी झेरॉक्स कॉपी वाटतो.

जॉन अब्राहम

जेव्हा जॉनला आपल्या सारखा दिसणारा आपला फैन भेटला तेव्हा त्याने एकत्र फोटो काढून सोशल मिडीयावर शेयर केला.

प्रीतम

प्रीतम बॉलीवूड मध्ये संगीतकार आहे. तर त्याच्या सारखा दिसणारा साहिल माकीजा हा व्यक्ती देखील म्युजिक आर्टिस्ट आहे.

अक्षय कुमार

तुम्ही जर WWE चे चाहते असाल तर तुम्ही रेसलर शॉन माइकलला ओळखत असालच तो आणि अक्षय कुमार जवळपास सारखे दिसतात.


Show More

Related Articles

Back to top button