Breaking News

एक्टिंग सोबतच स्पोर्ट्स मध्ये देखील उत्कृष्ट आहेत हे 10 बॉलीवूड स्टार्स, एक तर स्टेट लेव्हल पर्यंत टेनिस प्लेयर

बॉलिवूडच्या या स्टार्सना आपण त्यांच्या सुंदर अभिनयासाठी ओळखतो. आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही पण हे लोक अभिनय करण्याच्या व्यतिरिक्त चांगले स्पोर्ट्स खेळाडू देखील होते. या स्टार्सना स्पोर्ट्स मध्ये खास इंटरेस्ट आहे. हे आपल्या रिकाम्या वेळे मध्ये स्पोर्ट्स खेळतात. काही तर बॉलिवूड मध्ये येण्याच्या अगोदर या खेळांचे उत्कृष्ट खेळाडू देखील राहिले आहेत. चला तर जाणून घेऊ आपले कोणते आवडते स्टार्स कोणत्या खेळा मध्ये हुशार आहेत.

तापसी पनू – स्क्वाश

पिंक, बदला यासारख्या फिल्म मध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवलेल्या तापसी पनू आपल्या फिटनेस बद्दल जागरूक आहे. तापसी स्क्वाश (Squash) गेम खेळणे पसंत करते. तापसीने या गेम मध्ये आपले सह कलाकार जसे सकिब सलीम आणि वरुण धवन यांना हरवलं आहे.

सकीब सलीम – क्रिकेट

सकीब सलीम आपल्याला मेरे डैडी कि मारुती, दिल जंगली आणि रेस 3 मध्ये दिसला होता. सकीब सलीमला क्रिकेट खेळणे पसंत आहे. त्याने विराट कोहली सोबत देखील क्रिकेट खेळला आहे. एक्टिंग आणि मॉडेलिंगच्या अगोदर त्याला क्रिकेट मध्ये आपले करियर करायचे होते. तो सेलिब्रिटीज क्रिकेट लीग मध्ये मुंबई हिरोज टीमचा प्लेयर आहे.

रणदीप हुडा – ‘पोलो’

बॉलीवूड मध्ये रणदीप हुडा आपल्या अप्रतिम एक्टिंगसाठी ओळखला जातो. बॉलिवूड मध्ये त्याने आपली वेगळी फ़ैन फॉलोविंग बनवली आहे. परंतु अत्यंत कमी लोकांना माहीत आहे कि रणदीप हा एक प्रोफेशनल पोलो प्लेयर देखील आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान – टेनिस

होय तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल पण आमिर खान स्टेट लेव्हल टेनिस खेळाडू होता. तो नेशनल लेव्हलवर देखील जाणार होता पण त्याअगोदर त्याचा बॉलीवूड डेब्यू झाला.

रणबीर कपूर – ‘फुटबॉल’

अनेक चैरिटी इव्हेंट्स आणि फंक्शन्स मध्ये रणबीर कपूर ने आपल्या फुटबॉल स्किलला लोकांना दाखवलं आहे. रणबीर इंडियन सुपर लीगच्या मुंबई सिटी एफसी चे मालक आहे. एक्टिंग सोबतच तो फुटबॉल चांगल्या प्रकारे खेळू शकतो.

जॉन अब्राहम – ‘फुटबॉल’

जॉन हा फुटबॉल खेळण्याचा शौकीन आहे. त्याने फुटबॉल वर आधारित एका चित्रपटा मध्ये एक्टिंग देखील केली होती. जॉन फुटबॉलचा मोठा चाहता आहे अनेक प्रसंगी त्याने आपलं हे प्रेम जाहीरपणे दाखवले आहे. तो स्कुल डेज मध्ये फुटबॉल टीमचा कैप्टन होता.

राहुल बोस – ‘रग्बी’

बॉलिवूड मध्ये कमी पण दर्जेदार रोल करणारा राहुल बोस याचे रग्बी खेळामध्ये भारतासाठी मोठे योगदान आहे. होय, राहुलने इंडिया तर्फे आंतरराष्ट्रीय मैच मध्ये देखील इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

दीपिका पादुकोण – ‘बैडमिंटन’

दीपिका पादुकोण भारताचे महान बैडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची कन्या आहे. बॉलिवूड मध्ये येण्याच्या अगोदर बैडमिंटन खेळत असे. ती या खेळामध्ये एक्स्पर्ट आहे.

शाहरुख खान – हॉकी आणि क्रिकेट

शाहरुख खान आपल्या रिकाम्या वेळात क्रिकेट आणि हॉकी खेळणे पसंत करतो. तो आयपीएल मध्ये कोलकाता नाइट राइडर्स टीमचा मालक आहे. तसेच त्याने ‘चक दे इंडिया’ फिल्म मध्ये फिमेल हॉकी टीमच्या कोचची व्यक्तिरेखा केली होती.

अक्षय कुमार – ‘मार्शल आर्ट्स’

बॉलिवूड मधील सगळ्यात फिट कलाकार म्हणून ज्याच्या कडे पाहिले जाते तो अक्षय कुमार टायक्वोंडो मध्ये ब्लैक बेल्ट आहे आणि Muay Thai नावाच्या प्राचीन आर्ट मध्ये माहीर आहे. यामुळेच तो चांगल्या प्रकारे सगळे स्टंट करतो.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.