celebritiesentertenment

महानायक अमिताभ बच्चन यांनी उघडले गुपित, बॉलीवूड स्टार्सच्या लग्नात आहेर पाकीटामध्ये किती रुपये ठेवलेले असतात

तुम्हाला माहित आहेच कि सध्या बॉलीवूड मध्ये लग्नांचे सोहळे सुरु आहेत. अभिनेता रणवीर आणि अभिनेत्री दीपिका यांच्या लग्ना नंतर आता प्रियंका चोपडा आणि तिचा विदेशी बॉयफ्रेंड निक यांचे लग्न होणार आहे. एवढेच नाही तर राखी सावंत देखील लग्न करण्याच्या तयारीत आहे. पण लग्नांच्या या वातावरणा मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड सेलेब्सच्या विवाहा बद्दल एक गुपित सगळ्यांच्या समोर उघडे केले आहे. जसे कि तुम्हाला माहीतच आहे कि लग्न सोहळ्यामध्ये येणारे पाहुणे नवविवाहित जोडप्यासाठी काहीना काही गिफ्ट किंवा एखादे आहेराचे पाकीट घेऊन येतात. जे पाकीट आहेरा मध्ये दिला जातो त्यामध्ये पैसे असतात, सगळ्यांच्या मना मध्ये हा विचार येत असेल कि एवढ्या मोठ्या सेलेब्सच्या आहेराच्या पाकीटा मध्ये एखादी मोठी रक्कम दिली जात असेल आणि ती किती असेल. पण अमिताभ बच्चन यांनी या बद्दल खुलासा केला आहे कि या आहेर पाकीटा मध्ये किती रुपये असतात.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी असे सांगितले कि बॉलीवूड मध्ये शगुन म्हणून आहेर पाकीट देण्याची एक प्रथा आहे जी नेहमी प्रमाणे चालत आलेली आहे. जे पाहुणे बॉलीवूडच्या लग्नां मध्ये येतात त्यांच्यासाठी हे पाकीट एक समस्या होत होती. जे पाहुणे येत होते त्यांच्या मना मध्ये एकच विचार असायचा कि या पाकिटामध्ये किती रुपये भरावेत आणि किती भरू नयेत. त्याच सोबत अमिताभ बच्चन यांनी सांगितले कि जुनियर आर्टिस्ट किंवा मेकअप मैन आपल्या सिनियर स्टार किंवा निर्मात्याच्या लग्ना मध्ये जाताना संकोच करत होते.

अमिताभ बच्चन यांनी पुढे सांगितले कि ज्युनियर आर्टिस्ट किंवा मेकअप मैन अश्या लग्ना मध्ये जाताना संकोचत होते आणि याच दुविधेमुळे आहेर पाकीटा मध्ये एकशे एक रुपये भरण्याची सुरुवात झाली आणि मोठ्या पासून ते लहान सर्व कलाकारांसाठी एकच सीमा निश्चित केली गेली. असे करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे यामुळे एकरूपता यावी आणि कोणालाही संकोच वाटू नये.

पुढे अमिताभ बच्चन म्हणाले कि ते जेव्हा कोणत्याही कपलच्या विवाहात जात होते तेव्हा ते आपल्या सोबत एक पुष्पगुच्छ घेऊन जाणे पसंत करत होते पण त्यांची पत्नी जया बच्चन यांना हे बिलकुल आवडत नव्हते. अमिताभ बच्चन पुढे म्हणाले कि त्यांची पत्नी जया बच्चन यांचे असे मानने आहे कि जे पुष्पगुच्छ आपण विवाह सोहळ्यात घेऊन जातो ते फेकून दिले जातात.

असे अनेक लोक आहे जे बॉलीवूडच्या मोठ मोठ्या स्टार्सच्या लग्नाचा विचार करून त्यांना मिळणाऱ्या आहेर पाकीटा मध्ये भलीमोठी रक्कम मिळत असेल असा विचार करत असतील. परंतु असे काही नाही आहे जसे कि महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितले कि बॉलीवूड सेलेब्सच्या लग्ना मध्ये आहेर पाकीटा मध्ये फक्त एकशे एक रुपये भरले जातात. ज्यामुळे कोणताही ज्युनियर किंवा सिनियर संकोच करू शकणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button