“लालू प्रसाद यादव” यांच्यावर बनणार फिल्म, हा अभिनेता करू शकतो भूमिका

सध्या बॉलिवूड मध्ये रियल लाइफ स्टोरी वर फिल्म बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. आता या लिस्ट मध्ये “लालू प्रसाद यादव” यांचे नाव देखील समाविष्ट होईल असे वाटत आहे. होय, प्रोड्युसर ‘सौरभ कूमार’ लवकरच बिहारच्या राजकारणाला मोठ्या पडद्यावर दाखवण्याच्या तयारीत आहेत. हा पूर्णतः राजकारणावर आधारित चित्रपट असेल आणि 90 च्या दशका मधील बिहार मधील लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय प्रवासाला दाखवेल.

या अगोदर प्रोड्युसर सौरभ कुमार यांच्या प्रोडक्शन कंपनी अनेक रियालिटी टीव्ही शो केले आहेत. पण आता सौरभ कुमार हिंदी फिल्म ने बॉलिवूड मध्ये डेब्यू करू इच्छित आहेत. सौरभ कुमार आपल्या पत्नी सोबत या प्रोजेक्ट वर काम करत आहेत. या फिल्म मध्ये मुख्य भूमिकेसाठी मेकर्स ने ‘आर. माधवन’, ‘रितेश देशमुख’ आणि ‘सनी देओल’ यांच्या सोबत बोलणी सुरु केली आहेत. अजून पर्यंत या प्रोजेक्ट आणि यांच्या स्टारकास्ट बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती देण्यात आलेली नाही आहे. पण तरीही अंदाज केला जात आहे कि पुढील महिन्या पासून या फिल्मचे शूटिंग सुरु होईल.

फिल्म चे प्रोड्युसर सौरभ कुमार हे स्वतः मुळात बिहारचे आहेत. त्यामुळे ते बिहारचे राजकारण आणि तेथील वातावरण यांची चांगलीच माहिती असलेले आहेत आणि या विषयावर फिल्म बनवू इच्छितात. सौरभ म्हणतात ही एक थ्रिलर फिल्म असेल, ज्यामध्ये लोकांना मनोरंजनाच्या सोबतच एक चांगला संदेश देखील मिळेल.

लालू प्रसाद यादव हे भारतीय राजकारणातील एक आकर्षक व्यक्तिमत्व राहिले आहे त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारी चित्रपट पाहणे नक्कीच सगळ्यांना आवडेल. आपण आशा करुया कि हा चित्रपट लवकरात लवकर तयार होऊन त्यामध्ये लालूप्रसाद यादवांच्या जीवनातील आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी समजाव्यात. बाकी त्यांची भूमिका कोणीही केली तरी लालूंचे व्यक्तिमत्वच एवढे लोकप्रिय आहे कि त्यांच्या नावावरच फिल्म सुपरहिट होईल.