Breaking News

अबब..! सलमान खाननं केवळ 20 मिनिटांसाठी खर्च केले तब्बल 7 करोड

मुंबई, 12 मार्च: सलमान खानच्या (Salman Khan) ‘भारत’ आणि ‘दबंग 3’ नंतर त्याच्या फैन्स त्याचा येणारा सिनेमा ‘राधे’ बद्दल उत्सुकत आहेत. या सिनेमाची फैन्स आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सिनेमात बॉलीवूड एक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) सलमान खान सोबत रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाबाबत आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्सची 20 मिनिटं खूप विशेष असणार आहेत. या सिनेमाच्या क्लायमॅक्ससाठी सलमान खान ने करोडो रुपये खर्च केले आहेत.

Bollywood, salman khan, disha patani, salman khan new movie, salman khan news

रिपोर्टच्या नुसार सलमानचा येणारा सिनेमा ‘राधे’ च्या क्लायमॅक्समध्ये VFX इफेक्ट तंत्रज्ञान वापरले जाणार आहेत. हा सीन जवळपास 20 मिनिटांचा असणार आहे. ज्यात रणदीप हुड्डा आणि सलमान खान या दोघांमध्ये जबरदस्त फाइट पाहायला मिळणार आहे. या सीनला खरं तर स्टुडीओमध्ये शूट केला जाणार आहे. ज्यात क्रोमा तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. या 20 मिनिटांच्या सीनसाठी सलमान खान ने तब्बल 7.50 करोड खर्च केले आहेत.

सलमानच्या राधे चित्रपटात वापरली जाणारी क्रोम टेक्नॉलॉजी बाहुबली आणि बाहुबली 2 मध्ये देखील वापरण्यात आली होती. ही टेक्नॉलॉजी अतिशय महागडी आहे. यात सीन चित्रित करताना निळ्या आणि हिरव्या रंगाचं बॅकग्राउंडचा वापर केला जातो. पण यामध्ये वापरली जाणारी लाइट ही खूप महागडी असते. त्यानंतर VFX मध्ये यातील बॅकग्राउंड डिजिटली काढून टाकला जातो आणि मग त्या जागी तुम्हाला हवं असलेलं बॅकग्राउंड वापरलं जातं.

बातमीच्या नुसार या सिनेमातील फायनल सीन हा दुबईमध्ये शूट करण्यात येणार आहे. तर सिनेमाचं बरेचसे शूट हे दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि लखनऊमध्ये केलं जाणार आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स स्टुडिओमध्ये शूट होणार असून यामध्ये सलमान-रणदीप यांच्यातील अ‍ॅक्शन सीन आपणास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे. सलमानचा दबंग 3 देखील प्रभुदेवानंच दिग्दर्शित केला होता.

या चित्रपटा मधून सलमान खान आणि दिशा पाटनी ही जोडी पहिल्यादा एकत्र येणार आहे. याआधी दिशानं सलमाच्या भारतमध्ये सहाय्यक पाहुनी कलाकार म्हणून काम केलं होत. याशिवाय या सिनेमात जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या फिल्म बाबत दिशा पाटनी खूपच उत्साहित आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये या सिनेमाबाबात बोलताना पुन्हा एकदा मी सलमानसोबत काम करेन असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिशानं दिली होती.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.