celebrities

या 7 अभिनेत्रींच्या कामात वाढलेल्या वजनामुळे काही फरक नाही पडत, प्लस साइज असून देखील आहेत सुपरहिट

आजकाल वाढलेले वजन ही सर्वांच्यासाठी मोठी समस्या आहे. जाड लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर येतो एकूण लोकसंख्येच्या 47 टक्के लोक वजन वाढलेले आहेत. बॉलीवूड आणि टीव्हीवर अनेक अभिनेत्री अश्या आहेत ज्या प्लस साइज आहेत. वाढलेले वजन काही लोकांसाठी डिप्रेशनचे कारण होत तर काही लोकांना यामुळे काहीही फरक पडत नाही आहे आणि ते आपली लाइफ मोकळेपणाने जगत आहेत. त्यांना यामुळे कोणताही फरक पडत नाही की त्यांचे वजन वाढले आहे का कमी झाले आहे. त्यांना स्वता बद्दल कोणतीही तक्रार नाही आणि ते वजन वाढण्यामुळे चिंतीत होण्याच्या एवजी आपले काम चोख करण्याकडे लक्ष देतात. आज आम्ही तुम्हाला काही अश्याच टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्रींच्या बद्दल माहिती देत आहोत ज्यांना आपल्या वाढलेल्या वजनामुळे कोणताही फरक पडला नाही आणि ते आपल्या कामावर लक्ष देत आहेत आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेले यश त्यांना मिळाले आहे.

अंजलि आनंद

अंजलि आनंदला तुम्ही टीव्ही सिरीयल ‘ढाई किलो प्रेम में’ मध्ये पाहिले असेल. या सिरीयल मध्ये तिने वजन वाढलेल्या मुलीची भूमिका केली होती. अंजलीचे नाव एक यशस्वी प्लस साइज मॉडलच्या लिस्टमध्ये आहे.

स्मृति कालरा

स्मृति कालरा टीव्ही सिरीयल ’12/24′ मध्ये होती. प्लस साइज असून देखील लोकांना ती आवडते. या सिरीयल मध्ये तिने एका सामान्य मुलीची भूमिका केली होती.

भारती सिंह

भारती सिंह हे नाव कॉमेडी जगात एक मोठे नाव आहे. भारती टीव्ही सोबतच चित्रपटामध्ये देखील काम करते. यामध्ये कोणतेही दुमत नाही की यश मिळवण्यासाठी भारतीने भरपूर मेहनत केली आहे. पण त्याचेच फळ म्हणून आज तिला लोक कॉमेडी क्वीन म्हणून घराघरात ओळखतात.

डेलनाज़ ईरानी

डेलनाज़ ईरानी बॉलीवूड आणि टीव्हीवरची एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने अनेक बॉलीवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. जास्त वजन असून देखील तिला लोकांनी नेहमी पसंत केले आहे. ती सुंदर असण्या सोबतच टैलेंटेड पण आहे.

हुमा कुरैशी

हुमा कुरैशी बॉलीवूड मधली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘गैंग्स ऑफ वासेपुर’, ‘एक थी डायन’, ‘जॉली LLB 2’ आणि ‘काला’ यासारखे चित्रपट केले आहे. हुमाचे नाव देखील प्लस साइज अभिनेत्रीच्या लिस्ट मध्ये आहे.

विद्या बालन

विद्या बालन तर सर्वात प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री आहे. विद्या जेव्हा चित्रपटा मध्ये आली होती तेव्हा तर सडपातळ होती. पण हळूहळू तिचे वजन वाढत गेले. आता तर तिचे वजन चांगलेच वाढले आहे पण वाढलेल्या वजनाचा तिच्या कामावर काहीही परिणाम झालेला नाही. ती पहिले देखील हिट चित्रपट देत होती आणि आताही हिट चित्रपट देते.

रिताशा राठौर

हिंदी मधील प्रसिद्ध टीव्ही शो ‘बढो बहू’ मध्ये मुख्य अभिनेत्री असलेली रिताशा राठौर प्लस साइज अभिनेत्री आहे.

तर या काही प्रसिध्द आणि यशस्वी प्लस साइज अभिनेत्रींची लिस्ट होती ज्यांच्या कामामध्ये वजन अडथळा ठरले नाही.


Show More

Related Articles

Back to top button