celebritiesentertenment

या स्टार्सचे आहेत पाकिस्तान सोबत कनेक्शन, ऋतिक पासून ते करीना पर्यत आहेत शामिल

भारतातील कलाकार पाकिस्तान मध्ये गेले तर त्यांना देशद्रोही असल्याचे लोक बोलण्यास सुरुवात करतात. परंतु जरी भारत आणि पाकिस्तान आता शेजारी राष्ट असले तरी एक वेळ अशी होती जेव्हा आपण एक परिवार होतो. पण आता दोन्ही देशांच्या मध्ये सीमारेषा आली आहे आणि दोघांचे संबंधी चागले राहिलेले नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का की बॉलीवूडच्या अनेक स्टार्सचे मूळ हे पाकिस्तान मधले आहे. चला तर पाहुया असे बॉलीवूड स्टार्स ज्यांचा काहीना काही संबंध पाकिस्तान सोबत राहीला आहे.

कपूर परिवार

करीना कपूर खान, रणबीर कपूर आणि ऋषि कपूर यांचे मूळ पाकिस्तान सोबत जोडलेले आहे कारण फिल्म इंडस्ट्री मध्ये येणारे पहिले कपूर म्हणजेच पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 1906 मध्ये लायलपुर (फैसलाबाद), पाकिस्तान मध्ये झाला होता.

शाहरुख खान

किंग खानचा जन्म दिल्ली मध्ये एका मुस्लिम परिवारात झाला होता पण त्याचे वडील ताज मोहम्मद खान पेशावर मध्ये स्वतंत्रता सेनानी होते. त्याचे नानाजी, जान मोहम्मद पण अफगाणिस्तान मध्ये पठान होते.

संजय दत्त

मुन्नाभाई संजय दत्त याचे मूळ देखील पाकिस्तान मध्ये आहे. त्याच्या वडिलांचा सुनील दत्त यांचा जन्म झेलम, पंजाब, पाकीसान मध्ये झाला होता.

ऋतिक रोशन

ऋतिक रोशनचा जन्म मुंबई मध्ये झालेला आहे पण त्याचे दादाजी रोशनलाल यांचा जन्म गुजरानवाला, पंजाब मध्ये झालेला जे पाकिस्तान मध्ये आहे आणि त्याच्या नानाजीचा जन्म देखील पाकिस्तान मधील आहे.

गुलजार

हिंदी मधील लोकप्रिय लेखक गुलजार उर्फ संपूर्ण सिंह कालरा यांचा जन्म देखील पाकिस्तान मधील झेलम मध्ये झाला होता. फाळणी नंतर ते भारता मध्ये आले. त्यांना पद्मभूषण सहीत अनेक सन्मान दिले गेले आहेत.

गोविंदा

बॉलीवूड स्टार गोविंदा यांचे वडील अरुण कुमार आहुजा पण एक बॉलीवूड एक्टर होते, त्यांचा जन्म गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान मध्ये झाला होता.

दिलीप कुमार

‘ट्रैजिडी किंग’ दिलीप कुमार चे खरे नाव मोहम्मद यूसुफ खान आहे. यांचा जन्म पेशावर मध्ये झाला होता जे त्यावेळी ब्रिटीश इंडिया आणि आता पाकिस्तान मध्ये आहे.

अमिताभ बच्चन

इलाहबाद उत्तरप्रदेश मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला आहे. पण त्यांची आई तेजी सुरी बच्चन पाकिस्तान मधील होत्या. त्यांचा जन्म फैसलाबाद पाकिस्तान मधील एक सिख परिवारात झाला होता.

साधन शिवदासिनी

60’s ची सर्वात सुंदर आणि प्रसिध्द एक्ट्रेस साधना आपल्या काळातील सर्वात महागडी एक्ट्रेस मधील एक होती. साधनाचा जन्म कराची मधील एक सिंधी परिवारात झाला होता.

राजेंद्र नाथ मल्होत्रा

60’s मध्ये ‘एन इवनिंग इन पैरिस’ आणि ‘फिर वही दिल लाया हूँ’ सारख्या फिल्म मधून प्रेक्षकांना हसवणारे कॉमेडी एक्टर राजेंद्र नाथ मल्होत्रा चा जन्म करीमपुरा, पेशावर मध्ये झाला होता. नंतर ते जबलपुर, मध्यप्रदेश मध्ये येऊन राहू लागले. 2008 साली हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.


Show More

Related Articles

Back to top button