celebrities

सलमान खानच्या चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री बॉलीवूड सोडताच बनली २००० कोटींची मालकिन!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सिनेमातून चांगले यश मिळवले. पण करिअर जोरावर असतानाच लग्न केले आणि बॉलिवूडला रामराम ठोकला. यातील एक नाव म्हणजे गजनी फेम अभिनेत्री असिन. या ‘५’ अभिनेत्रींनी लग्नानंतर बॉलिवूड सोडले!

साऊथ सिनेमा ते बॉलिवूड

असिनने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ सिनेमातून केली आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारली. ‘नरेन्द्रन मकान जयकंथान वाका’ या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पर्दापण केले. तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती.


लहानपणापासूनच असिनने तमिळ, तेलगू, मल्याळम भाषांमध्ये काम केले आणि अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिने सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान आणि अभिषेक बच्चन यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत सिनेमात काम केले. आमिर खानसोबतच्या गजनी सिनेमातून असिनने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

 

विवाहबद्ध झाली

त्यानंतर अनेक हिट सिनेमे दिले. आणि २०१६ मध्ये मायक्रोमॅक्सचा को फाऊंडर राहुल शर्मासोबत विवाहबद्ध झाली. असिनच्या साखरपुड्यानंतर तिची इंगेजमेंट रिंग खूप चर्चेत होती. या रिंगची किंमत सुमारे ६ कोटी इतकी होती. राहुल शर्मा हा बिजनेजमन असून तो बॅडमिंटन उत्तम खेळतो. २०१४ मध्ये मायक्रोमॅक्सचा रेवेन्यू १० हजार कोटी इतका होता. राहुल शर्मा या कंपनीचा को-फाऊंडर आहे. लग्नानंतर बॉलिवूड सोडून असिन पतीचा २००० कोटींचा बिजनेस सांभाळत आहे.


Show More

Related Articles

Back to top button