celebrities

तुम्हाला माहित आहे का या वृक्षा बद्दल, सुरक्षेसाठी असतात गार्ड जे प्रत्येक पानावर ठेवतात कडक नजर

तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की राजकारणी आणि सेलेब्रिटी लोकांच्या आजूबाजूला नेहमी सिक्युरिटी असते पण कधी तुम्ही पाहिले आहे का एखाद्या झाडाची सिक्युरिटी होताना. होय आज आम्ही तुम्हाला अश्या झाडा बद्दल सांगत आहोत ज्याच्या आजूबाजूला अत्यंत कडक सुरक्षा कवच आहे आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तैनात असलेले सुरक्षा रक्षक यागोष्टीकडे विशेष लक्ष देतात की या झाडाचे एकही पान खाली पडणार नाही. तुमच्या माहितीसाठी हे झाड कुठे आहे आणि या झाडाची एवढी सुरक्षा का केली जाते हे आता आपण पाहू.

हे झाड तसे तर एक सामान्य पिंपळाचे झाड आहे परंतु या झाडाचे महत्व अत्यंत जास्त आहे. तुमच्या माहितीसाठी हा वृक्ष बोध वृक्ष आहे जेथे महात्मा बुध्द यांनी ज्ञान प्राप्त केले होते. पण हे झाड बिहार मधील बोधगया वाले नाही आहे. तर हे झाड मध्य प्रदेश मध्ये लावलेले आहे. होय तुमच्या माहितीसाठी मध्यप्रदेश सरकार द्वारा लावले गेलेले हे झाड खरतर बौध वृक्षाचाच भाग आहे ज्यास श्रीलंकेतून मागवले गेले आहे. तुमच्या मनातील प्रश्नांना शांत करण्यासाठी आणि तुमच्या माहितीसाठी खरतर बिहार मधील बौध गया येथे लावलेले बोधी वृक्ष देखील एक शाखा आहे ज्यास श्रीलंकेतून मागवले गेले होते आणि मागील काळात जेव्हा श्रीलंकेचे प्रधानमंत्री जेव्हा इंडिया मध्ये आले होते तेव्हा त्यांनी विशेष रूपाने तेथील बोधी वृक्षाची एक फांदी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेट स्वरूपात दिली होती. त्यानंतर श्रीलंकेचे प्रधानमंत्री आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मिळून बोधी वृक्षाची फांदीचे रोपण केले होते ज्याचे रुपांतर आता मोठ्या वृक्षात झाले आहे.

मध्यप्रदेश मध्ये हा बोधी वृक्ष एका टेकडीवर लावले आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी नेहमी दोन-तीन गार्ड तैनात असतात. जेणेकरून या वृक्षास कोणतेही नुकसान होऊ नये. दुरून पाहिल्यास हे एक साधारण वृक्ष असल्याचे दिसते आणि यामुळे या झाडाच्या आजूबाजूला असलेले सिक्युरिटी गार्ड पाहून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटते की या वृक्षामध्ये असे काय खास आहे की सुरक्षा रक्षक या वृक्षाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

या बोधी वृक्षाच्या सुरक्षेसाठी मध्यप्रदेश सरकारने आता पर्यंत जवळपास 65 लाख रुपये खर्च केला आहे आणि याच सोबत याच्या सुरक्षेसाठी 4 जवान तैनात केले आहेत. या वृक्षास पाणी देण्यासाठी सकाळ-संध्याकाळ फायर बिग्रेडची गाडी येते. तसेच या बोधी वृक्षास बाहेरून कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता चारी बाजूने जाळी लावण्यात आली आहे. सध्या हा बोधी वृक्ष 15 फुट उंच झालेला आहे.


Show More

Related Articles

Back to top button