Connect with us

रक्त शुद्ध करण्याचे उपाय म्हणून आहारात करा या गोष्टींचा समावेश

Food

रक्त शुद्ध करण्याचे उपाय म्हणून आहारात करा या गोष्टींचा समावेश

रक्त शुद्ध करण्याचे उपाय : आपल्या शरीरातील रक्त शरीराच्या लाखो-करोडो सेल्सना ऑक्सिजन, मिनरल्स आणि अन्य पोषक तत्व पोहचवण्याचे कार्य करते आणि हेच सेल्स आपल्या शरीराला निरोगी ठेवतात पण आजकाल लोकांच्या खराब खानपानाच्या सवयीमुळे आपले शरीर हळूहळू दुषित होत आहे विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर निघत नसल्यामुळे ते आपल्या रक्ता मध्ये जातात आणि रक्त दुषित करतात ज्यामुळे आपल्याला अनेक आजाराचा सामना करावा लागतो. ज्यामुळे आपल्याला मुख्यतः त्वचा रोग होण्याची सर्वात मोठी शक्यता असते. जर तुम्ही आपल्या शरीराला निरोगी आणि सुंदर ठेवू इच्छित असाल तर त्यासाठी आपले रक्त शुद्ध ठेवणे आवश्यक आहे.

अन्न पदार्थामध्ये अधिक अम्लीय पदार्थ, मीठ, अनुचित खानपान आणि बद्धकोष्ठता यामुळे रक्त दुषित होते. तुम्ही साखरेच्या एवजी गुळ सेवन केले पाहिजे, आज आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून रक्त शुद्ध करण्याचे उपाय म्हणून आहारा मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे याबद्दल माहिती देत आहोत.

रक्त शुद्ध करण्याचे उपाय

लिंबू : जर तुम्ही लिंबाचा आपल्या आहारामध्ये समावेश केला तर यामुळे तुमचे रक्त शुद्ध होईल यासाठी लिंबू गरम पाण्यामध्ये दिवसातून तीन वेळा घेतला पाहिजे, पाणी चहा प्रमाणे गरम असले पाहिजे किंवा एका लिंबाचे चार भाग करा आणि चार कप दुध भरा प्रत्येक कपामध्ये एक तुकडा पिळा आणि त्वरित प्या, प्रत्येक 10 मिनिटानंतर एक-एक कप प्यावे, असे तुम्हाला 5 आठवडे करायचे आहे असे केल्यामुळे शरीरातील रक्त स्वच्छ होईल आणि तुमच्या शरीरात शक्ती येईल, तुम्हाला भूक लागेल सोबतच बद्धकोष्ठता दूर होईल.

कारले : जर तुम्ही आपल्या शरीरातील दुषित रक्त पुन्हा शुद्ध करू इच्छित असाल तर यासाठी कारले तुम्हाला मदत करतील. यासाठी तुम्हाला 60 ग्राम कारल्याचा रस एक कप पाण्यात मिक्स करून दररोज नियमित काही दिवस सेवन करावे लागेल. यामुळे रक्त शुद्धीकरण होईल.

कडुलिंब : आपल्या रक्ताला शुध्द करण्यासाठी कडूलिंबाच्या पिकलेल्या 10 लिंबोळ्याचा रस शोषून घेतल्याने रक्त शुद्ध होते. याच सोबत कडूलिंबाची पाने सेवन केल्याने देखील रक्त शुद्धीकरण होते.

कांदा : रक्त शुध्द करण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही कांद्याचा रस 1/4 कप आणि एक लिंबाचा रस किंवा मध मिक्स करून 10 दिवस रोज नियमित सेवन केल्याने रक्ताच्या संबंधित विकार दूर होतात आणि रक्त शुद्ध होते.

आवळा : जर तुम्ही आवळा वापरत असाल तर त्यामुळे रक्ता मध्ये वाढलेली गरमी कमी होते, रक्ता मधील अशुद्धता दूर होते आणि रक्त शुद्धीकरण होते. विटामिन सी आवळ्यामध्ये असल्याने नवीन रक्त तयार करण्यास देखील हे मदत करते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top