Connect with us

जेव्हा अमेरिका बनवते अणुबॉम्बने चंद्र उडवण्याची योजना

Entertenment

जेव्हा अमेरिका बनवते अणुबॉम्बने चंद्र उडवण्याची योजना

आपणच जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रगत देश असल्याचे दाखवण्यासाठी अमेरिका काय करेल कोणीही सांगू शकत नाही. अशीच एक योजना त्यांनी आखली होती चंद्र अणुबॉम्बने उडवण्याची. याची सविस्तर माहीती आज आपण पाहूयात.

गोष्ट सन 1958 ची आहे जेव्हा अमेरिकेने एका आगळावेगळा प्रोजेक्टवर काम सुरु केले होते.

होय हाच तो प्रोजेक्ट ज्याचे नाव A 119 होते, ज्याला “ए स्टडी ऑफ लुनर रिसर्च फ्लाईटस” या नावाने पण ओळखले जाते, अमेरिकन वायू सेने द्वारे 1958 मध्ये विकसित एक फार मोठी गुप्त योजना होती ही.

या प्रोजेक्टचा उद्देश चंद्रावर अणुबॉम्बचा विस्फोट करणे होता, त्यांचे मानणे होते की हा विस्फोट ग्रह, खगोल विज्ञान आणि ज्योतिषशास्त्रा मधील काही रहस्यांचे उत्तर देण्यासाठी मदत करतील. त्याच सोबत लोक उघड्या डोळ्यांनी चंद्रावरील हा विस्फोट बघू शकतील. जो एक विलक्षण, शानदार आणि रोमांचक दृष्य देणारा अनुभव राहील. याच सोबत अमेरिकन लोकांचा अमेरिकन टेक्नोलॉजी, वायू सेना आणि त्यांच्या शक्तीवर गर्व होईल तसेच सेने वरील त्यांचा विश्वास वाढेल.

या योजने अंतर्गत पहिले चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब घेऊन जाण्याचे प्लानिंग होते, पण अमेरिकन एयर फोर्स ने सल्ला दिला की हायड्रोजन बॉम्बचे वजन जास्त असेल, यासाठी कमी वजनाचा कोणताही हलका बॉम्ब निवडला पाहिजे ज्यामुळे मिसाईल त्याला सहज घेऊन जाऊ शकेल. या सल्ल्या नंतर ठरले की W 25 नावाचा लाईट वेट बॉम्ब जो 1.7 किलोटन यील्ड चा आहे. (तर 1945 मध्ये हिरोशिमा वर सोडलेला लिटिल बॉय बॉम्बची स्ट्रेंथ 13-18 किलोटन यील्ड होती.) पुढील योजने अनुसार बॉम्बला रॉकेट द्वारे चंद्राच्या मागील लपलेल्या भागावर नेऊन तेथे विस्फोट केला जाईल. विस्फोट झाल्या नंतर धुळीच्या कणांमुळे ढग तयार होईल आणि तो सूर्याच्या प्रर्खर प्रकाशामुळे जळेल आणि याप्रकारे जळणारा धुळीचा ढग पृथ्वीवरून चमकताना दिसेल. जे एक सुंदर आणि रोमांचक दृष्य असेल.

पण शेवटी लोकांचा नकारात्मक दृष्टीकोन आणि दुसरीकडे वैज्ञानिकांचे अनुमान आणि सल्ल्या मुळे जानेवारी 1959 मध्ये हा प्रोजेक्ट रद्द केला गेला. कारण चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे आणि याचा सरळ संबंध पृथ्वी बरोबर आहे. यामुळे लोकांना ही भीती होती की चंद्रावर केलेल्या विस्फोटाचे दुष्परिणाम पृथ्वीवर पडू शकतात.

या अमेरिकन प्रोजेक्टची माहीती तेव्हा समजली जेव्हा सन 2000 मध्ये राष्ट्रीय एयरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या लियोनार्ड रेफेल द्वारे याचा खुलासा केला गेला. त्यांनीच 1958 मध्ये या परीयोजनेचे नेतृत्व केले होते.

या प्रोजेक्टची माहीती जवळजवळ 45 वर्ष गुप्त राहिली आणि सोबतच रेफेल च्या खुलासा केल्या नंतरही, संयुक्त राज्य सरकार ने या अभ्यासामध्ये आपली भागीदारी असल्याचे कधीही अधिकृतरीत्या मान्य केले नाही. याचा अर्थ अमेरिकन सरकार या प्रोजेक्ट संदर्भात नेहमीच आपले हातवर करत राहिली आहे.

अशी होती चंद्राला अणुबॉम्बने उडवण्याची योजना पण खरे तर हे आहे की आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी अमेरिका नेहमीच निसर्गाला दुर्लक्षित करत आली आहे. मग ते कार्बन उत्सर्जन असो किंवा जापान वरील अणुबॉम्ब हल्ला असो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top