health

फक्त 2 गोळ्या आजाराचा उपचार करते, एक वेळा जरूर वापरून पहा आणि फरक बघा

Black pepper health benefits in marathi : मसाल्याचा राजा अर्थात किंग ऑफ स्पाइस किंवा ब्लैक पेपर यानावाने काळीमिरी ओळखली जाते. काळीमिरी आपण मसाल्या मध्ये वापरतो. तर अनेक वेळा हिचा वापर आपण अनेक आजारात औषधी म्हणून देखील करतो. काळीमिरी चवीला तिखट असते पण तेवढीच गुणकारी देखील असते यामुळे हिचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधा मध्ये देखील केला जातो.

काळीमिरी, काळे मीठ, भाजलेला जीरा आणि ओवा यांना वाटून बारीक पावडर करून लस्सी किंवा लिंबू पाणी मध्ये टाकून पिण्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित राहते. यामध्ये कैल्शियम, आयरन, फॉस्फोरस, कैरोटिन, थाईमन आणि रीथोफ्लेब्न सारखे पौष्टिक तत्व असतात. स्टडी मध्ये असे समजले आहे की काळीमिरी मध्ये बायो- एन्हंस्र नावाचे रसायन असते, ज्याच्या उपस्थिती मुळे कोणत्याही औषधाचा परिणाम वाढतो तसेच औषध कमी प्रमाणत घेतले तरी वेगाने परिणाम दाखवते.

आवश्यक साहित्य :

15 काळीमिरी

2 बदाम

5 मनुके (खिसमिस)

2 छोटी इलायची

एक गुलाबाचे फुल

अर्धा चमचा खसखस

250 मिली दुध

कृती :

15 काळीमिरी, 2 बदाम, 5 खिसमिस, 2 छोट्या इलायची, एक गुलाबाचे फुल, अर्धा चमचा खसखस सर्व साहित्य एका भांड्यात भिजत ठेवा आणि सकाळी रगडून 250 मिली दुधात मिक्स करून रोज नियमित काही महिने पिण्यामुळे डोक्यात ताजगी येईल आणि डोक्याचा थकवा दूर होईल.

20 ग्राम काळीमिरी, 50 ग्राम बदाम, 20 ग्राम तुळसीची पाने एकत्र वाटून थोडेसे गुळ मिक्स करून छोट्याछोट्या गोळ्या बनवा आणि या 2 गोळ्या मधासोबत मिक्स करून चाटणे. यामुळे बुद्धिमत्तेत वाढ होते.

एक चमचा घी आणि 8 काळीमिरी आणि साखर मिक्स करून रोज चाटण्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

याचे फायदे : Black pepper health benefits in marathi

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी काळीमिरी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुमचे ब्लड प्रेशर वाढले असेल तर छोटा चमचा काळीमिरी पावडर अर्धा ग्लास पाण्यात मिक्स करून प्यावे. तुमचे बीपी कंट्रोल होण्यास सुरुवात होईल.

पोटामध्ये गैस किंवा एसिडीटी या समस्या होत असल्यास लगेच लिंबू मध्ये काळे मीठ आणि काळीमिरी पावडर किंवा 2 दाने मिक्स करून हा रस चाटावा. हा उपाय तुमच्या अपचन आणि गैसच्या समस्येला त्वरित ठीक करेल.

जे लोक संधिवात या समस्येने त्रासलेले असतील त्यांनी तिळाच्या गरम तेला मध्ये काळीमिरी टाकून त्यास थंड करावे आणि नंतर त्या तेलाने संधिवात असलेल्या जागी मालिश करा. असे केल्यामुळे वेदने मध्ये आराम मिळेल.

जर पोटामध्ये जंत (किडे) झाले असतील तर थोडीशी काळीमिरी पावडर एक ग्लास ताकामध्ये मिक्स करून प्यावे. दुसरा उपाय हा आहे की खिसमिस सोबत काळीमिरी दिवसातून तीन वेळा खावे.

हल्लीच कैंसर वर झालेल्या एका संशोधनात समजले आहे की महिलांसाठी काळीमिरीचे सेवन करणे फायदेशीर असते. काळीमिरी मध्ये विटामिन सी, विटामिन ए, फ्लैवोनॉयड्स, कारोटेन्स आणि इतर एन्टी ऑक्सीडेंट तत्व असतात. काळीमिरी ब्रेस्ट कैंसर पासून बचाव करण्यास मदतशीर असते. ही त्वचेच्या कैंसर पासून देखील शरीराचे रक्षण करते.

Black pepper health benefits in marathi please share with friends

आम्ही आज पर्यंत 250 पेक्षा जास्त लेख विविध आरोग्य विषयक समस्यांवर marathigold.com वर प्रकाशित केले आहेत आणि यापुढेही करत राहणार आहोत तरी जर आता पर्यंत तुम्ही आमचे फेसबुक पेज लाईक केले नसेल तर आताच करा. ज्यामुळे तुम्हाला आमचे लेख प्रकाशित झाल्याची माहिती लगेच मिळेल.

फेसबुक पेजची लिंक : fb.com/marathigold

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते


Show More

Related Articles

Back to top button