Hair Care

असे बनवा आयुर्वेदिक तेल ज्यामुळे जुने पांढरे केस देखील होतील काळे आणि घनदाट

आपले केस काळे आणि घनदाट असावेत असे प्रत्येकाला वाटते, मंग तो पुरुष असो किंवा स्त्री सुंदर केस सर्वांनाच पाहिजे असतात. कारण केस काळे आणि घनदाट असतील तर व्यक्तीची सुंदरता वाढते. परंतु अनेक वेळा पोषक तत्वांची कमी झाल्यामुळे केस कमजोर आणि पांढरे होतात. केस नाजूक आणि पांढरे झाल्यामुळे त्यांची सुंदरता कमी होते.

तुम्हाला माहित आहे खोबरेल तेलात काय मिक्स करावे?

तुम्हाला माहीतच असेल की कमजोर आणि पांढरे केस ही जवळपास बहुतेक लोकांना सतावणारी समस्या आहे आणि लोक यावर विविध प्रकारचे तेल वापरतात. पण हे केसांवर केलेले प्रयोग कधी फायदा करतात तर कधी नुकसान देखील करतात कारण वेगवेगळ्या तेलांचा वापर केल्याने केस अजून जास्त खराब होतात आणि यामुळे साईड इफेक्ट पण होऊ शकतो. यासाठी कधीही वेगवेगळे तेल सतत बदलू नये.

केसांना काळे आणि घनदाट बनवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुमचे केस काळे आणि घनदाट होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत त्यामध्ये खाली वस्तूंची आवश्यकता आहे.

आवश्यक साहित्य :

25 ग्राम कडीपत्ता

25 ग्राम कडूलिंबाची पाने

300 ग्राम खोबरेल तेल

केस गळणे थांबवणारे उपाय - Hair Fall Tips in Marathi

तेल बनवण्याची कृती आणि वापरण्याची पद्धत

सर्वात पहिले कडुलिंब आणि कडीपत्ता सावली मध्ये व्यवस्थित सुकवून घ्या आणि सुकल्यानंतर या पानांना मिक्सर मध्ये बारीक पावडर बनवा. आता ही तयार केलेली पावडर 300 ग्राम खोबरेल तेलामध्ये मिक्स करा आणि मंद आचेवर तेल गरम करा. तुम्हाला तेल गरम तो पर्यंत करायचे आहे जो पर्यंत तेलामधील पानांच्या पावडरीचा रंग हलका काळा होत नाही तो पर्यंत. या नंतर तेल थंड होऊ द्या, तेल थंड झाल्यावर काचेच्या बाटली मध्ये ठेवा. रात्री झोपताना या तेलाने केसांना चांगली मालिश करा. असे केल्यामुळे काही दिवसात चांगले परिणाम दिसून येतील.


Show More

Related Articles

Back to top button