कलम 370 रद्द केल्यानंतर मोदी सरकार अजून एक धडाकेबाज ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये

सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये मोदी सरकारने मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्याचा धडाकाच लावलेला आहे. तिहेरी तलाक पाठोपाठ कलम 370 कलम रद्द करणे यासारखे महत्वाचे निर्णय याकाळात मोदी सरकारने घेतले आहेत. आता मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचा अंदाज केला जात आहे. तसे संकेत सरकारकडून मिळत आहेत.

युनायटेड इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच ओरिएंटल इंडिया विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपन्याचे एका कंपनी मध्ये विलीनीकरण होणार असल्याचे समजत आहे. आपल्या माहितीसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी त्यांच्या 2019-20 सालच्या आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तशी घोषणा केली होती. ज्यामध्ये जीवन-विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी जनरल विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) अधिनियम 1972 यामध्ये बदल करण्यासाठी प्रस्ताव होता.

ज्यानंतर अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सार्वजनिक क्षेत्रामधील 3 जनरल विमा कंपन्यांचे विलीनीकरण करणार असल्याचे नुकतेच लोकसभेत सांगितले होते. या तीन जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या विलीकरणाची घोषणा 2018-19 साली तेव्हाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देखील केली होती. परंतु यासंदर्भात पुढे काहीही केले गेले नाही. परंतु आता यानिर्णयावर अर्थमंत्रालय गंभीरपणे विचार करत असल्याचे समजले आहे. येत्या काही दिवसात यासंदर्भातील मोठा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here