Connect with us

लोकांची एक समस्या सोडवून कसा भाविश झाला 100 करोड रुपयाचा मालिक

Money

लोकांची एक समस्या सोडवून कसा भाविश झाला 100 करोड रुपयाचा मालिक

Bhavish Aggarwal OLA Cab founder success story in Marathi : भविश अग्रवाल, ola cab चे फाउंडर आणि सीईओ आहेत. ज्यांनी लहान वयात सर्वात मोठी ऑनलाईन टैक्सी सर्विस देणारी कंपनी सुरु करून अनेक दिग्गज बिजनेसमैन लोकांना आश्चर्यचकीत केले आहे.

भविश अग्रवाल हे  IIT चे विद्यार्थी होते. कैब सर्विस सुरु करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांना फक्त यशस्वी बिजनेसमैन बनवले नाही तर त्यासोबत लोकांना ऑनलाईन कैबची सोप्पी सुविधा देऊन त्यांनी प्रवासी लोकांची एक मोठी समस्या सहज सोडवली आहे. आता एका क्लिकवर ओला कैब टैक्सी सर्विस चा फायदा आपण घेऊ शकतो, एवढेच नाही तर भविश अग्रवाल हे नाव जगातील बेस्ट बिजनेसमैनच्या यादी मध्ये समाविष्ट झाले आहे.

‘ओला कैब’ चे सीईओ आणि फाउंडर भाविश अग्रवाल – Bhavish Aggarwal OLA Cab founder success story in Marathi

भविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 मध्ये लुधियान मध्ये झाला.

भविश अग्रवाल यांनी मुंबई आयआयटी मधून बीटेक इंजिनियरिंग पूर्ण केले आहे.

भविश यांनी माइक्रोसॉफ्ट कंपनी मध्ये देखील आपले नाव कमावले आहे. या दरम्यान भविशने दोन पेटंट मिळवले होते.

परंतु भविशचे लक्ष्य नोकरी करून पैसे कमावणे नव्हते तर समाजातील समस्या सोडवून त्यावर समाधान मिळवणे होते. त्यांच्या याच विचारातून त्यांना यशस्वी बनवले.

भविश ने बंगलोर ते बांदीकुईचा प्रवास आरामदायक करायचा होता त्यासाठी त्यांनी एक कार बुक केली पण ती कार आपल्या इच्छित स्थळी पोहोचायच्या अगोदरच ड्रायव्हरने त्यांच्याकडे पैसे मागितले आणि भविश सोबत वाईट वर्तणूक केली ज्यामुळे कंटाळून भविशला आपला हा प्रवास बसने करावा लागला. यादरम्यान त्यांना ऑनलाईन टैक्सी सर्विस सुरु करण्याचा विचार आला आणि त्यांनी प्रवाश्यांच्या समस्यांवर केवळ तोडगा काढला नाही तर यामुळे ते देशातील प्रसिध्द बिजनेसमैन देखील झाले.

भविशला आलेल्या समस्येवर त्यांनी उपाय शोधून काढला आणि ही समस्या सर्वांना होणारी समस्या असल्यामुळे हा शोधून काढलेला उपाय सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिला. त्यांच्या या एका निर्णयामुळे त्यांना भरपूर यश आणि पैसा मिळवून दिला. त्यांनी स्वस्तामध्ये चांगली आणि आरामदायक प्रवासी सेवा सुरु करून दिली ज्यामुळे त्यांना कमी कालावधीतच प्रचंड मोठे यश मिळाले.

ओला कैंब आता जवळपास 100 पेक्षा जास्त शहरा मध्ये आपली सेवा देते. आज ओला ही देशातील सर्वात मोठी ऑनलाईन टैक्स सर्विस कंपनी झाली आहे ज्या कंपनीचे उत्पन्न 100 करोड पेक्षा जास्त आहे. ओला एप्लिकेशन हे शहरात राहणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड केलेले असतेच.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top