Connect with us

मैट्रीमोनियल साइट्स वर फेक प्रोफाईल कसे ओळखावे, करू नका या चुका

Money

मैट्रीमोनियल साइट्स वर फेक प्रोफाईल कसे ओळखावे, करू नका या चुका

आजकाल लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणे फार कठीण झालेले आहे आणि त्याचाच फायदा मैट्रीमोनियल साइट्स घेत आहेत आणि त्यांनी लाखो रुपयाचा नाही तर करोडो रुपयाचा धंदा यावर केलेला आहे. आपण आपल्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी विविध मैट्रीमोनियल साइट्सवर आपला प्रोफाईल अपलोड करत असतो आणि अनेक प्रोफाईलवर इंटरेस्ट सेंड करत असतो पण बर्याच वेळा हे प्रोफाईल फेक सुध्दा असतात. आज या पोस्त मधून आपण मैट्रीमोनियल साइट्स वर होणाऱ्या फसवणूक कशी टाळता येईल ते पाहू.

बैकग्राउंड चेक करा

जसे कोणत्याही पुस्तकाला त्याच्या सुंदर कवर वरून ते चांगलेच असेल हे ठरवता येत नाही तसेच. कोणत्याही व्यक्तीचा प्रोफाईल पाहून त्याला जज करता येत नाही. प्रोफाईलवर दिलेली माहिती नेहमीच खरी नसते. त्या व्यक्ती बद्दल सोशल मिडियावर जाऊन माहिती काढण्याचा प्रयत्न करा. कॉमन कनेक्शन भेटले तर त्या व्यक्तीबद्दल माहिती जरूर मिळावा.

सार्वजनिक स्थानी भेट घ्या

बैकग्राउंड चेक केल्यानंतर जर तुम्हाला वाटले की व्यक्ती तशीच आहे जसे प्रोफाईल मध्ये लिहिलेले आहे तर त्याच्या सोबत तुम्ही भेट करू शकता. पण भेट घेताना सावध राहा. नेहमी भेटण्यासाठी सार्वजनिक ठिकाणाची निवड करा. कारण त्या व्यक्तीच्या स्वभावा बद्दल तुम्हाला अजून पुरेशी माहिती नाही.

जेव्हा पर्सनल होण्याचा प्रयत्न केला जातो

आवश्यक नाही की ज्या व्यक्तीला तुम्ही भेटत आहात त्याच्यासोबत लग्न होईल किंवा केले पाहिजे. हे पण आवश्यक नाही की पहिल्या भेटी मध्येच तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व पर्सनल गोष्टी त्याच्या सोबत शेयर केल्या पाहिजेत. जर ती व्यक्ती तुमच्या पर्सनल आयुष्या बद्दल जास्त प्रश्न करत असेल तर थोडे सतर्क राहा. पहिल्या भेटी मध्ये जर कोणी घरी भेटण्यास बोलावले तर सरळ नकार द्या.

पैश्यांची मदत करणे

मैट्रीमोनियल साइट्स कधी-कधी सुरक्षित नसतात. या साईटवर अनेक वेळा लोक फ्रॉड करतात. अनेक लोक या साईटचा वापर लोक इतरांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे काढण्यासाठी आणि त्यांना लुबाडण्यासाठी करतात. त्यामुळे जर पहिल्या भेटी मध्ये जर कोणीही तुम्हाला आर्थिक मदत मागत असेल तर समजावे काही तरी गडबड आहे. त्यामुळे या जाळ्यात अडकू नका आणि समजदारी यात राहील की अश्या लोकांपासून दूर राहा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top