health

50 रुपयाचे विषारी मच्छर पळवणारे रिफील का वापरता जर फक्त 3 रुपयात चांगले रिफील घरीच बनवता येत असेल तर

बाजारामध्ये मिळणारे ब्रांडेड कंपनीचे विषारी मच्छर पळवणारे रिफील वापरण्या पेक्षा घरी बनवलेले रिफील वापरल्यास पैसे आणि आरोग्य चांगले राहण्या सोबतच मच्छरचा त्रास देखील होणार नाही.

मच्छर किती भयंकर आजार पसरवतात हे तुम्हाला वेगळे सांगायची आवश्यकता नाही.  मच्छर चावल्याने भयंकर आजार होऊ शकता. सोबतच झोप पूर्ण होत नाही. यासाठी मच्छर पळवण्यासाठी विविध उपाय करतात. पण तुम्ही पाहिले असेल की अनेक उपाय करूनही मच्छर आपल्याला चावतातच..

मच्छर पळवणारी कोइल आणि रिफीलचा देखील यांच्यावर परिणाम होत नसल्याचे जाणवते. अनेक लोक घरामध्ये कोइल वापरण्याच्या एवजी रिफील वापरतात जे जास्त सुरक्षित आहे. यामध्ये कोणत्याही धुराची समस्या नसते. पण रिफील महाग असते आणि लवकर संपून जाते.

आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही घरात फक्त 3 रुपये खर्च करून नवीन रिफील बनवू शकता. सोबतच या घरगुती पद्धतीने बनलेल्या रिफीलचा मच्छरवर जास्त प्रभाव होतो. मच्छर मारण्यासाठी तुम्ही बाजारातून मॉस्क्यूटो किलर मशीन घेऊन येता आणि जेव्हा त्याची रिफील संपते, तेव्हा बाजारातून नवीन रिफील आणावी लागते. जी तुम्हाला जवळपास 50 रुपया पेक्षा जास्त किमतीला मिळते. तसेच ही रिफील शरीराला हानिकारक देखील असते. तर चला तुम्हाला आम्ही सांगतो घरी रिफील कशी बनवायची…

या घरगुती उपायाने मच्छर मुक्त बनवा आपले घर

सर्वात पहिले एक रिकामी रिफील घ्या आणि त्याचे झाकण उघडा. त्यानंतर एक कापूर (जो पूजेमध्ये वापरला जातो) घ्या आणि त्यास एखाद्या वस्तूच्या मदतीने बारीक पावडर करावे. कापूर आजकाल मेणाचा देखील बाजारात येत आहे त्यामुळे कापूर खरेदी करताना काळजीपूर्वक आणि खात्री करून खरेदी करा.

यानंतर तारपीन तेल घ्या. हे तुम्हाला कोणत्याही हार्डवेयरच्या दुकानात मिळेल. आता पावडर केलेला कापूर रिकाम्या रिफील मध्ये टाका आणि त्यानंतर त्यामध्ये तारपीन तेल टाका आणि रिफीलचे झाकण बंद करा. यानंतर रिफील हालवून तारपीन तेल आणि कापूर एकत्र करा.

तर अश्या प्रकारे तुमची नवीन रिफील तयार आहे. तुमची ही घरगुती पद्धतीने तयार झालेली रिफील बाजारातील रिफील पेक्षा जास्त चालेल आणि तुमच्या आरोग्यावर दुष्प्रभाव करणार नाही. सोबतच यामध्ये असलेले कापूर मच्छर आणि इतर किटाणू संपवेल. घरामध्ये स्वच्छ हवा असेल तर अर्धे आजार आपोआप दूर होतील.


Show More

Related Articles

Back to top button