Health Tips in MarathiSkin Care in Marathi

स्किन एलर्जी झाली तर करा हे अप्रतिम उपाय, लगेच मिळेल आराम

स्किन एलर्जी होण्याचे अनेक कारणे असू शकतात आणि स्किन एलर्जी झाल्यामुळे त्वचेवर मुरुमे आणि फोड्या येतात. तसेच खाज सुटते. जर वेळीच स्किन एलर्जी कडे लक्ष दिले तर ती लवकर बरी होते. आज आम्ही तुम्हाला स्किन एलर्जी बद्दल काही प्रभावी उपाय सांगत आहोत. ज्यांच्या मदतीने आपण स्किन एलर्जी ठीक करू शकता.

स्किन एलर्जी झाल्यावर करा हे उपाय

कडुलिंबाच्या पानांचा लेप

कडुलिंबाची पाने त्वचेसाठी उत्तम मानली जातात आणि यास खाण्यामुळे आणि यांच्या पाण्याने त्वचा स्वच्छ केल्याने स्किन संबंधित अनेक समस्या ठीक होतात. जर आपल्याला स्किन एलर्जी झाली, तर आपण कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आपल्या त्वचेवर लावा. ही पेस्ट लावल्यामुळे स्किन एलर्जी ठीक होईल आणि आपल्याला यापासून आराम मिळेल.

आपण कडुलिंबाची 10 ते 15 पाने पाण्यामध्ये भिजवून त्यांची बारीक पेस्ट तयार करा आणि हा लेप आपल्या त्वचेवर लावा. हा लेप आपण कमीतकमी 30 मिनिट आपल्या त्वचेवर लावून ठेवा. 30 मिनिटा नंतर पाण्याच्या मदतीने आपण हा लेप स्वच्छ करा. कडुलिंबामध्ये एंटी बैक्टिरियल गुण असतात जे स्किन एलर्जीला दूर करण्यासाठी मदत करतात. हि पेस्ट आपण दिवसातून तीन वेळा लावावी. आपल्याला यामुळे स्किन एलर्जी पासून आराम मिळेल.

कडुलिंबाचे तेल

आपल्याला वाटल्यास आपण त्वचेवर कडुलिंबाचे तेल लावू शकता. कडुलिंबाचे तेल लावल्यामुळे देखील एलर्जी दूर होते. स्किन एलर्जी झाल्यास आपण रात्री झोपताना थोडेसे कडुलिंबाचे तेल त्वचे वर लावा. सकाळ पर्यंत आपली स्किन एलर्जी ठीक होईल.

कडुलिंबाची पावडर

कडुलिंबाची पावडर खाण्यामुळे देखील स्किन एलर्जी दूर होते. स्किन एलर्जीची समस्या झाल्यास आपण एक चमचा कडुलिंबाची पावडर पाण्याच्या सोबत घेऊ शकता. या पावडर चे सेवन केल्याने आपल्याला मुरुमा पासून सुटका मिळेल.

कडुलिंबाची पावडर तयार करण्यासाठी आपण काही कडुलिंबाची पाने सावली मध्ये सुकवा. जेव्हा हि पाने चांगली कोरडी होतील तेव्हा या पानांना मिक्सर मध्ये बारीक करून पावडर तयार करा.

एलोवेरा जेल स्किन एलर्जी दूर करण्यासाठी

एलोवेरा जेल त्वचेला थंडावा देण्याचे काम करते आणि यास त्वचेवर लावल्याने स्किन एलर्जी दूर होते. त्यामुळे आपल्याला जेव्हाही स्किन एलर्जीचा त्रास होईल तेव्हा आपण एलोवेरा जेल आपल्या त्वचेवर लावा.

मुलतानी माती

मुलतानी माती प्राचीन काळापासून त्वचेच्या संबंधीत समस्यांना दूर करण्यासाठी वापरली जाते. मुलतानी माती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि जळजळ, खाज, लाल दाणे यापासून आराम मिळतो. तसेच स्किन एलर्जी झाल्यावर देखील आपण मुलतानी माती लावू शकता. यास लावल्याने एलर्जी मध्ये आराम मिळतो.

मुलतानी मातीची पेस्ट तयार करण्यासाठी एक चमचा मुलतानी माती मध्ये गुलाब जल मिक्स करा आणि या पेस्टला स्किन एलर्जी झालेल्या भागावर लावा. जेव्हा हि पेस्ट चांगली कोरडी होईल तेव्हा पाण्याच्या मदतीने त्वचा स्वच्छ करा.

वाचा Health Tips in Marathi आणि Skin Care in Marathi सगळ्यांत पहिले मराठी गोल्ड वर.
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close