dharmik

फक्त चित्रपटा मध्येच नाही तर आपल्या धर्म-ग्रंथात देखील आहेत खऱ्या मैत्रीची प्रतीके

फ्रेंडशिप वर आधारित चित्रपट पाहून आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त इतर फ्रेंडशिपची उदाहरणे दिसतच नाहीत. चित्रपटातील ते पात्र आपल्या डोक्यात नेहमी असतात. म्हणून तर मैत्रीचे उदाहरण देण्याचा प्रश्न आला तर सर्वात पहिले जय-विरू यांचे नाव तोंडावर येते. पण तुम्हाला माहित आहे का जय-विरूच्या मैत्रीपेक्षा जास्त चांगला मित्र दुर्योधन होता.

होय, महाभारता मध्ये एक खलनायक म्हणून आपल्याला माहित असलेला दुर्योधन हा एक सर्वोत्तम मित्र होता. फक्त हेच एक उदाहरण नाही तर आपल्या ग्रंथांमध्ये अजूनही असे बरेच नावे आहेत जे त्यांच्या अप्रतिम मैत्रीसाठी प्रसिध्द आहेत. यातील काही नावे आपल्याला त्यांच्या नकारात्मक भूमिकेसाठी प्रसिध्द असलेली दिसतील पण तरीही त्यांच्यातील मैत्रीला तुम्ही नाकारू शकत नाहीत.

चला पाहू आपल्या ग्रंथा मध्ये कोणाकोणाची मैत्री एकदम पक्की होती आणि त्याला तोड नव्हती.

दुर्योधन-कर्ण

भलेही संपूर्ण जग दुर्योधनास अधर्मी आणि वाईट मानत असेल पण कर्ण हा त्याच्यासाठी जीव की प्राण होता. कर्ण आणि दुर्योधन यांची मैत्री म्हणजे एक प्रतिक आहे. जेव्हा सर्वांनी कर्णाचा अपमान केला आणि त्याला स्विकारण्यास नकार दिला, तेव्हा दुर्योधनाने त्याला साथ दिली. एवढेच नाही तर कर्णाला अंगदेशाचा राजा केले. तर दुसऱ्या बाजूला कर्णाने देखील आपली मैत्री निभावण्यासाठी कोणतीही कमी ठेवली नाही. पूर्ण आयुष्य दुर्योधनाच्या बाजूने कर्ण उभा राहीला आणि त्याच्यासाठी लढता-लढता मृत्यू प्राप्त झाला.

श्रीकृष्ण-द्रोपदी

कदाचित क्वचितच तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले असेल पण द्रोपदी आणि श्रीकृष्ण यांच्यात चांगली मैत्री होती. तेव्हाच तर द्रोपदीच्या प्रत्येक संकटामध्ये श्रीकृष्ण मदत करायचे. चीरहरणच्या वेळी आणि वनवासात ऋषि दुर्वासाच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडले.

श्रीराम-विभीषण

रावणाचा भाऊ असून सद्धा विभीषण ने प्रभू श्रीरामाच्या बाजूने होते. रावण आणि लंका यांच्या बाबतीत सर्व लहानमोठी गोष्ट त्यांनी श्रीरामांना सांगितली ज्यामुलेच भगवान श्रीरामांना रावण वध शक्य झाला. हे सर्व विभीषण आणि श्रीराम यांच्या मैत्री आणि निष्ठेमुळे झाले.

श्रीकृष्ण-अर्जुन

श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे तर हजारो किस्से प्रसिध्द आहेत. संपूर्ण गीता श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या मैत्रीचे प्रतिक आहे असे बोलले तर चुकीचे ठरणार नाही. भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी अर्जुनाची साथ दिलेली आणि प्रत्येक परस्थिती मध्ये अर्जुनाचे रक्षा कवच बनून राहिले.

सीता-त्रिजटा

त्रिजटा ही लंकेमधील एक दासी होती. जेव्हा रावण माता सीतेचे अपहरण करून लंकेला घेऊन गेला तेव्हा माता सीता आणि त्रिजटा यांची भेट झाली. राक्षस कुळातील असून सुध्दा त्रिजटा एक सरळ व्यवहारी होती. त्रिजटाने नेहमी माता सीतेची काळजी घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले. एवढेच नाही तर रावण वध झाल्याची आनंदवार्ता त्रिजटाने माता सीताला दिली.

श्रीकृष्ण-सुदामा

भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री तर सर्वांना माहित आहे. दोघांनी एकाच गुरुकुलात शिक्षण घेतले. श्रीकृष्ण एक राजकुमार होते तर सुदामा एक गरीब ब्राह्मण. तरीही दोघांमध्ये चांगली मैत्री होती. ज्या पद्धतीने श्रीकृष्ण आणि सुदामा एक दुसऱ्याचा सन्मान करत होते ते एक मैत्रीचे प्रतीकच होते.

तुम्हाला देखील एक असाच जीवाला जीव देणारा मित्र नक्की असेल त्याच्या सोबत ही पोस्ट जरूर शेयर करा. पोस्ट आवडली असेल तर लाईक करा.


Tags
Show More

Related Articles

Back to top button