30 हजार रुपये किलो विकल्या जाणाऱ्या या भाजी मध्ये आहे अनेक गुणांचा खजाना, PM मोदी स्वतः सेवन करतात

0
22

प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याला अनुरूप अन्न सेवन करत असतो आणि प्रत्येकाला आपल्या आवडी निवडीच्या अनुसार वस्तूंचे सेवन करण्याचा अधिकार आहे. पण बऱ्याच अश्या वस्तू आहेत ज्या महागड्या असतात ज्यामुळे लोक त्यांच्या बद्दल विचार देखील करत नाहीत. अशीच एक भाजी आहे ज्यामध्ये अनेक गुणांचा खजिना आहे पण याची किंमत समजल्यावर आश्चर्य होईल. 30 हजार रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाऱ्या या भाजीमध्ये गुणांचा खजिना आहे. चला पाहू कोणती आहे ही भाजी.

या औषधी गुणांनी भरपूर असलेल्या वनस्पतीचे नाव आहे मार्कुला एस्क्यूपलेटा. यास सामान्य भाषे मध्ये मशरूम बोलले जाते. हे चवीला अप्रतिम असतात आणि अनेक औषधी गुण यामध्ये असतात. बहुतेक लोकांना यांच्या औषधी गुणांच्या बद्दल माहिती नाही त्यामुळे ते यांच्या औषधी गुणांचा फायदा घेऊ शकत नाहीत. हे मशरूम नैसर्गिक पद्धतीने डोंगराळ भागात उगवतात आणि जंगल तोडण्यामुळे यांची संख्या कमी होत आहे. ज्यामुळे बाजारा मध्ये यांचे दर जास्त आहेत. यांचे सेवन भाजी म्हणून केला जातो आणि हे आपल्याला हिमाचल मधील मोठ्या हॉटेल मध्ये मिळू शकतात.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात चे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना काही पत्रकारांनी विचारले होते कि त्यांच्या एनर्जी चे रहस्य काय आहे? त्यावर उत्तर देताना त्यांनी हिमाचल प्रदेश मधील मशरूम सेवन केल्याने एनर्जी मिळते असे सांगितलं होत. खरंतर पीएम मोदी अनेक वर्ष हिमाचल प्रदेश मध्ये एक पार्टी कार्यकर्ता म्हणून तेथे होते आणि तेथे त्यांचे अनेक मित्र आजही आहेत. मोदींना मशरूम आवडते कारण डोंगराळ भागात शाकाहारी लोकांना प्रोटीन आणि गरम प्रवृत्ती असलेल्या वस्तूंची गरज पडते आणि हे त्याचे चांगले श्रोत आहेत. यामध्ये बी कॉम्पलेक्स विटामिन, विटामिन डी आणि काही आवश्यक एमीनो एसिड असतात जे हार्ट अटैकचा धोका कमी करतो. याची मागणी केवळ भारता मध्येच नाही तर युरोप, अमेरिका, फ्रांस आणि इतर देशात आहे. जास्त मागणी आणि कमी उपलब्धी यामुळेच यांची किंमत जास्त आहे. हि भाजी सगळ्यात जास्त हिमाचल, काश्मीर आणि डोंगराळ भागात मिळते.

हे असतात या मशरूम चे फायदे

औषधी गुणांनी भरपूर हे मशरूम नियमित सेवन केल्याने हार्ट संबंधित समस्या होत नाहीत. विटामिन बी, सी, डी आणि के हे भरपूर प्रमाणात मिळतात. सर्दी, वजन वाढणे इत्यादी समस्येत फायदेशीर. किमोथेरपी केल्या नंतर येणारा अशक्तपणा दूर करण्यास मदत होते. सूज कमी करण्यास लाभदायक.