Connect with us

जर तुम्ही वापरत असाल सोन्याची अंगठी तर या 10 गोष्टीकडे लक्ष द्या, बदलू शकते तुमचे भाग्य

Astrology

जर तुम्ही वापरत असाल सोन्याची अंगठी तर या 10 गोष्टीकडे लक्ष द्या, बदलू शकते तुमचे भाग्य

अनेक लोकांना सोन्याची अंगठी घालण्यास आवडते. सर्व साधारणपणे हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी सोन्याची अंगठी घातली जाती. सोने हे बहुमुल्य धातू आहे आणि याची चमक कधी कमी होत नाही. यामुळे सोन्याच्या आभूषणाकडे लोक जास्त आकर्षित होतात. सोन्याची अंगठी ही फक्त एक आभूषण नाही आहे तर ज्योतिष शास्त्रात यास सौभाग्य वाढवणारे मानले गेले आहे.

सोने हे धातू गुरु ग्रहाशी संबंधीत आहे. सोन्याची अंगठी घातल्यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह बदलू शकतो.

सोन्याची अंगठी इंडेक्स फिंगर म्हणजेच तर्जनी बोटामध्ये वापरणे जास्त शुभ असते.

जर तुम्ही सोन्याची अंगठी घातली असेल तर तुम्ही नशा करणे टाळले पाहिजे. हा गुरु ग्रहाचा धातू आहे. सोने धारण करून नशा केल्यामुळे गुरु ग्रह अशुभ फळ देतो.

इंडेक्स फिंगर मध्ये सोन्याच्या अंगठी मध्ये पुष्कराज रत्न धारण केला पाहिजे. लक्षात ठेवा पुष्कराज धारण करण्या अगोदर ज्योतिष्यास कुंडली जरूर दाखवावी.

जे लोक वजन वाढल्यामुळे त्रस्त आहेत त्यांनी सोन्याची अंगठी घालण्यापासून वाचले पाहिजे. गुरु ग्रहामुळे ही समस्या अजून वाढू शकते.

सोन्याची अंगठी उजव्या हातामध्ये घालावी. ही अंगठी डाव्या हातात घालणे अशुभ मानले जाते.

लक्षात ठेवा सोन्याची अंगठी हरवणे अपशकून मानले जाते. यासाठी नेहमी सतर्क राहा.

आयुर्वेद अनुसार सोने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सोने धारण केल्यामुळे तेवढेच फायदे मिळतात जेवढे स्वर्ण भस्म सेवन केल्यामुळे मिळतात.

जर एखाद्याच्या कुंडली मध्ये शनी अशुभ असेल तर सोन्याची अंगठी धारण करण्यापासून वाचले पाहिजे. अन्यथा नुकसान होऊ शकते.

सोने धारण केल्यामुळे आकर्षण वाढते. सोने आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. अंगठी सतत आपल्या त्वचेच्या संपर्कात राहील्यामुळे त्वचा चमकदार होते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पर्स मध्ये ठेवलेल्या यागोष्टी बनू शकतात तुमच्या दुर्भाग्याचे कारण

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top