astrology

सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे हे भाग फडकण्यामुळे फायदा होतो

सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीचे शरीर अत्यंत संवेदनशील असते. व्यक्तीकडे एक अशी शक्ती असते जी होणाऱ्या घटनांचे संकेत पहीलेच देतात परंतु हे पण सत्य आहे कि आजकाल या गोष्टीना अंधविश्वासच्या नावाखाली यागोष्टींवर विश्वास ठेवला जात नाही. पण जर तुम्ही सामुद्रिकशास्त्राबद्दल माहिती मिळवलेली असेल तर व्यक्तीच्या शरीराचा कोणता भाग फडकण्याचा काय अर्थ आहे हे तुम्हाला सहज माहित होईल. पूर्वीच्या काळी अंग फडकण्या बद्दल अनेक मान्यता होत्या ज्या आजही प्रचलित आहेत. अनेक ठिकाणी यांना शकून आणि अपशकून यांच्याशी संबंध जोडला जातो. यामध्ये किती सत्य आहे हे प्रत्येकाने आपल्या अनुभवाने ठरवावे. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून शरीराचा कोणता भाग फडकण्याचा काय अर्थ होतो याची माहिती देत आहोत.

कपाळ

जर एखाद्या व्यक्तीचे कपाळ फडकत असेल तर याचा अर्थ लवकरच जमीन किंवा घराचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच जमीन किंवा घर खरेदीची योजना बनवली जाऊ शकते आणि यामध्ये तुम्ही यशस्वी बनाल जर कपाळ फडकत असेल. नोकरी मध्ये पदोन्नती देखील मिळू शकते आणि मानसन्मान मिळू शकतो.

दंड

जर व्यक्तीचे दंड फडकत असतील तर धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला येणाऱ्या काळात एखाद्या मार्गाने धनलाभ होऊ शकतो.

हात

जर एखाद्याचे हात फडफडत असतील तर हे शुभ मानले जाते कारण हात फडकण्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता असते आणि तुम्ही श्रीमत होऊ शकता.

छाती

जर एखाद्या व्यक्तीची छाती फडकत असेल तर हे यश मिळण्याचे संकेत आहेत आणि तुम्हाला एखाद्या कार्यात लवकरच विजय मिळू शकतो.

नाभी

जर एखाद्याची नाभी फडकत असेल तर याचा अर्थ होतो की लवकरच तुम्हाला एखाद्या यात्रे दरम्यान फायदा मिळू शकतो.

पाय

जर एखाद्याच्या तळपाया मध्ये फडफड होत असेल तर याचा अर्थ तुम्ही एखाद्या प्रवासाला जाऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला फायदा होईल.

उजवा डोळा

जर उजव्या डोळ्यावरची पापणी फडकत असेल तर खुशखबरी किंवा धनलाभ होऊ शकतो.

उजवा हात

जर एखाद्याचा उजवा हात फडकत असेलतर हे शुभ मानले जाते. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तर डावा हात फडकणे हानिकारक होऊ शकते.


Show More

Related Articles

Back to top button